pune sakal
पुणे

Pune News : मराठा आरक्षण प्रश्नी महादेवनगर-मांजरी येथे मशाल व कँडल मार्च; जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्याने समाजबांधवात आनंद

महादेवनगर येथे आज सकाळपासून सुरू केलेल्या साखळी उपोषणातील कार्यकर्त्यांना सुरेश

कृष्णकांत कोबल

मांजरी - मराठा आरक्षण मागणी व त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाच्या समर्थनार्थ यथील सकल मराठा समाजाच्या वतीने मशाल व कँडल मार्च काढण्यात आला होता. महादेवनगर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालय ते मांजरी बुद्रुक गावठाणातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असा सुमारे चार किलोमीटर हा मोर्चा होता. डोक्यावर भगव्या टोप्या, एक मराठा-लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे-नाही कुणाच्या बापाचे व छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने हा मोर्चा शांततेत पार पडला.

महादेवनगर येथे आज सकाळपासून सुरू केलेल्या साखळी उपोषणातील कार्यकर्त्यांना सुरेश घुले हस्ते यांच्या हस्ते पाणी पाजून पहिल्या दिवशीचे उपोषण सोडविण्यात आले. त्यानंतर समाजातील महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून हजारो समाजबांधवांच्या सहभागाने मशाल व कँडल मार्चला सुरूवात झाली. मोर्चा पुढे जात असताना रस्त्यात शेकडो समाज बांधव त्यामध्ये सहभागी झाले. महिलांचाही यामध्ये मोठा सहभाग होता.

सकल मराठा समाजाच्या उत्थानासाठी उपोषण करीत असलेले जरांगे पाटील यांनी हा लढा पुढे नेण्यासाठी जगले पाहिजे. समाज बांधवांना त्यांच्या मार्गदर्शनाची मोठी गरज आहे. त्यासाठी किमान पाणी तरी प्राशन करावे, अशी भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, पुढील दोन महिन्याकरिता जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्याने कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT