नवी सांगवी : येथील इंद्रप्रस्थ चौकातील शंकराचा पुतळा भाविकांचे श्रद्धास्थान होत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मागिल काही महिण्यात शहरातील चौकात आयलँण्ड म्हणून बेटीबचाव बेटीपढाव तसेच पर्यावरणाचा संदेश देणारे शिल्प वा त्यांचे पुतळे बसविण्यात आले. याचा महापालिकेचा मुख्य उद्देश भरधाव वाहणचालकांना चाप बसून वाहतुक सुरळीत करणे हा तर होताच परंतु त्यातून मुलगी वाचवा... मुलगी शिकवा... याबरोबर पर्यावरणाचे संवर्धन करा हा संदेशही लोकांपर्यंत पोहचविणे हा होता. महापालिकेचा हा उद्देश काही प्रमाणात खरा ठरून यशस्वीही झाला.
परंतु येथील पवना नदीकाठच्या दशक्रीया घाटासमोरील चौकातील आयलँण्ड अधिकच समयसूचक वाटते. मरणानंतर कैलासवास होणारी व्यक्तीच्या दहाव्याच्या धार्मिक विधीकरीता या घाटावर जमणाऱ्या नागरिकांचे लक्ष या चौकातील भगवान शंकराकडे न जाईल ईतके नवलच... लोकांची धार्मिक श्रद्धा व रस्त्यावरील वाहतुक निर्विघ्न पार पाडणे या दोन्हीही गोष्टी यामुळे साध्य झाल्या. रस्त्याच्या मधोमध ध्यानस्त बसलेले भगवान शंकर महादेवांमुळे भरधाव आलेल्या वाहनांचा वेग पुतळ्याला पाहुन मंदावतो व हात जोडता नाही आले तरी मनोमन शंकराला नमण करून हे वाहणचालक पुढे जातात. त्यामुळे ऐरवी अपघाताला निमंत्रण ठरलेल्या हा चौकातील वाहतुक आता बऱ्यापैकी सुरळीत होऊन छोटेमोठ्या अपघातांचे प्रमाणही थंडावले आहे. त्यामुळे हा चौक आता भगवान शंकराच्या भक्तांचे श्रद्धास्थान झाला आहे.
या पुतळ्याच्या आजुबाजुचे व्यापारी दुकानदार दर सोमवारी याची पूजा करतात. महादेवाला हारफुले वाहुन नतमस्तक होतात. उद्याच्या शेवटच्या श्रावणी सोमवारी (सोमवती अमावस्या) ह्या सर्व भक्त मंडळींनी सकाळपासून महादेवाची पूजा, भजन व प्रसादाचे आयोजन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.