मांडवगण फराटा - ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांनी शेतीपूरक व्यवसायात उतरावे व शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून वेगवेगळ्या व्यवसायांची निवड करावी. शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याबरोबरच इतर व्यवसायांमध्ये उतरल्यास संस्थांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नक्कीच मदत होईल.
कारण गावच्या विकासाचा कणा असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था टिकल्या तरच गावचं गावपण टिकणार आहे." असे प्रतिपादन पुणे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी केले. ते मांडवगण फराटा ( ता. शिरूर ) येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेने चालू केलेल्या 'आपले सरकार' सेवा केंद्राच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.
"केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार येथील विकास सोसायटीने शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ऑनलाईन कामांसाठी मदत व्हावी यासाठी आपले सरकार सेवा केंद्र चालू केले आहे. संस्थेच्या वतीने रासायनिक खत विभाग, पाइपलाइन व ठिंबक सिंचन विभाग, कापड विभाग असे वेगवेगळे व्यवसाय चालवले जातात. भविष्यात संस्थेसाठी जमीन खरेदी करून त्यावर भव्य शेतकरी मॉल व सीएनजी पंप चालू करण्यात येणार आहे." अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष गोविंद फराटे, घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, घोडगंगाचे माजी संचालक सुधीर फराटे यांनी यावेळी दिली.

"बँक पातळीवर १००% कर्ज वसुली केलेल्या सोसायट्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रिबेट द्यावे." अशी मागणी यावेळी बोलताना दादा पाटील फराटे यांनी केली.
यावेळी सहाय्यक निबंधक कार्यालयीन अधिकारी दिपक वराळ, संस्थेचे अध्यक्ष गोविंद फराटे, माजी अध्यक्ष महादेव फराटे, घोडगंगाचे माजी संचालक सुधीर फराटे इनामदार, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण फराटे,
उपाध्यक्ष अमोल जगताप, सचिव राहुल ढमढेरे, बँकेचे विभागीय अधिकारी सचिन रणदिवे, उपसरपंच अशोक जगताप, कैलास फराटे, ज्ञानेश्वर फराटे, सचिन फराटे, रुपाली फराटे, मिनाक्षी फराटे, दिलीप फराटे, शरद गायकवाड, रामचंद्र यशवंते, गणेश फराटे, संजय फराटे, वसंत घाडगे, सोमनाथ चोथे, सोमनाथ जगताप, सुनिल फराटे आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.