खडकवासला : मागील पाच दिवसापासून पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार ही धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून १३ जुलैपासून आज मंगळवार सकाळपर्यंत चार धरणांतील पाणीसाठा देखील साडेपाच टीएमसीने वाढला आहे. अशी नोंद खडकवासला पाटबंधारे विभागाकडे झाली आहे.
गुरुवार 13 जुलै सकाळपासून 18 जुलै मंगलवार सकाळी या पाच दिवसात टेमघर येथे 380मिलिमीटर, पानशेत येथे 299, वरसगावला 303 तर खडकवासला येथे 93 मिलिमीटर पाऊस पडला आहे. असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सांगितले. या चार ही धरणात १३ जुलै रोजी 8.37 टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता. सोमवारी संध्याकाळी 13.66टीएमसी झाला आहे. ही वाढ 5.29 टीएमसी झाली. त्याच बरोबर या चारपाच दिवसात 0.25 टीएमसी शहर आणि अन्य पाणी योजनेसाठी सोडले. एकूण वाढ मिळून 5.54टीएमसी झाली आहे.
पावसाची संततधार
धरण क्षेत्रात सोमवारी पावसाचा जोर बऱ्यापैकी होता. परंतु संततधार मात्र कायम होती. मागील 24 तासात मंगळवारी सकाळी टेमघर येथे 74 वरसगाव ला 55 व पानशेत येथे 55 व खडकवासला येथे 23मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे.
ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.