Corona-patient Sakal
पुणे

पुणे : कोरोना रुग्णांची संख्या गेल्या तीन आठवड्यात ६४,२४३ ने झाली कमी

गेल्या तीन आठवड्यात पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील मिळून एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ६४ हजार २४३ ने कमी झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

गेल्या तीन आठवड्यात पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील मिळून एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ६४ हजार २४३ ने कमी झाली आहे.

पुणे - गेल्या तीन आठवड्यात पुणे शहर, (Pune City) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि ग्रामीण भागातील मिळून एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या ६४ हजार २४३ ने कमी (Decrease) झाली आहे. यामुळे तीन आठवड्यांपूर्वी म्हणजेच २९ जानेवारी रोजी असलेल्या ६९ हजार ५११ सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या शुक्रवारी (ता. १८) ५ हजार २६८ झाली आहे. या तीन आठवड्यात पुणे शहरातील ३० हजार ८८२ सक्रिय कोरोना रुग्ण कमी झाले आहेत.

पुणे शहरात २९ जानेवारी २०२२ ला एकूण ३३ हजार ५२८ सक्रिय कोरोना रुग्ण होते. शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता २ हजार ६४६ झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये २१ हजार ७१५ इतकी ही संख्या ती आता १ हजार २८९ झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील ही संख्या २० हजार ४२६ ने कमी झाली आहे. ग्रामीण भागात (जिल्हा परिषद, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्डांसह) तीन आठवड्यापूर्वी १४ हजार २६८ इतकी असलेली ही संख्या आता १ हजार ३३९ झाली आहे. ग्रामीण भागातील १२ हजार ९३५ सक्रिय रुग्ण तीन आठवड्यात कमी झाले आहेत.

शहर, जिल्ह्यात १ जानेवारी २०२२ पासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरवात झाली होती.या लाटेत जिल्ह्यातील सर्वाधिक एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २४ जानेवारीला ९३ हजार ६४२ इतकी नोंदली गेली होती. मात्र २५ जानेवारीपासून हळूहळू ही संख्या कमी होण्यास सुरवात झाली. यानुसार २९ जानेवारीपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची ओहोटी सुरु झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.

रुग्णांच्या संख्येचे आठवडानिहाय चढ-उतारांचे आलेख

(ता. ८ जानेवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यानची स्थिती)

पुणे शहर

  • ८ जानेवारी २०२२ --- ११ हजार ५५०

  • १५ जानेवारी --- ३१ हजार ९०७

  • २२ जानेवारी --- ४५ हजार ९५०

  • २९ जानेवारी --- ३३ हजार ५२८

  • ५ फेब्रुवारी --- १६ हजार ६२३

  • १२ फेब्रुवारी --- ६ हजार ५३१

  • १८ फेब्रुवारी --- २ हजार ६४६

  • तीन आठवड्यात कमी झालेले रुग्ण --- ३० हजार ८८२

पिंपरी चिंचवड

  • ८ जानेवारी २०२२ --- ४ हजार १६५

  • १५ जानेवारी --- १३ हजार ९८६

  • २२ जानेवारी --- २५ हजार ८३७

  • २९ जानेवारी --- २१ हजार ७१५

  • ५ फेब्रुवारी --- ९ हजार २९

  • १२ फेब्रुवारी --- ३ हजार ९६

  • १८ फेब्रुवारी --- १ हजार २८९

  • तीन आठवड्यात कमी झालेले रुग्ण --- २० हजार ४२६

पुणे ग्रामीण (जिल्हा परिषद, नगरपालिका व कॅंटोन्मेंटसह)

  • ८ जानेवारी २०२२ --- ३ हजार १४२

  • १५ जानेवारी --- १० हजार १०४

  • २२ जानेवारी --- १७ हजार ८८६

  • २९ जानेवारी --- १४ हजार २६८

  • ५ फेब्रुवारी --- ७ हजार २९

  • १२ फेब्रुवारी --- ३ हजार ११८

  • १८ फेब्रुवारी --- १ हजार ३३९

  • तीन आठवड्यात कमी झालेले रुग्ण --- १२ हजार ९३५

एकूण पुणे जिल्हा

  • ८ जानेवारी २०२२ --- १८ हजार ८५७

  • १५ जानेवारी --- ५५ हजार ९९७

  • २२ जानेवारी --- ८९ हजार ६७३

  • २९ जानेवारी --- ६९ हजार ५११

  • ५ फेब्रुवारी --- ३२ हजार ८८१

  • १२ फेब्रुवारी --- १२ हजार ७४५

  • १८ फेब्रुवारी --- ५ हजार २६८

  • तीन आठवड्यात कमी झालेले रुग्ण --- ६४ हजार २४३

पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सुरवातीपासूनच दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्‍णांच्या तुलनेत दिवसात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या कमी झाली होती. यामुळे सक्रिय कोरोना रुग्ण संख्या वेगाने वाढू लागली होती. परंतु २४ जानेवारीनंतर नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढले आणि तिसऱ्या लाटेच्या ओहोटीला सुरवात झाल्याचे दिसून आले.

- डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT