दिलीप मोहिते पाटील sakal
पुणे

पुणे : एकतर्फी प्रेम ठेवू नका,मी साथ देणारा माणूस-दिलीप मोहिते पाटील

आंबेठाण गावात विविध विकासकामांसाठी अलीकडच्या काळात ७ कोटी रुपयांचा निधी

रुपेश बुट्टेपाटील - आंबेठाण

आंबेठाण : आंबेठाण गावात विविध विकासकामांसाठी अलीकडच्या काळात ७ कोटी २५ लक्ष रुपयांचा निधी दिला आहे.भविष्यात अधिक विकासकामांसाठी मागणी केल्यास अजून निधी दिला जाईल फक्त मला एकतर्फी प्रेम नको.विकास कामांच्या बदल्यात आगामी निवडणूकीत पक्षावर मतदानाच्या माध्यमातून प्रेम दाखवा असे आवाहन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आंबेठाण ता.खेड येथे नागरिकांना केले.

आंबेठाण-म्हाळूगे रस्ता,आंबेठाण बाह्यवळण रस्ता, मुख्य रस्ता ते चव्हाण आणि बुट्टेवस्ती रस्ता उद्घाटन आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी आमदार दिलीप मोहिते पाटील,पंचायत समिती सभापती अरुण चौधरी,बाजार समिती सभापती विनायक घुमटकर,कैलास सांडभोर,दिनेश मोहिते,चंद्रकांत इंगवले,वसंत भसे,कैलास लिंभोरे,रोहिदास गडदे,मयूर मोहिते,अमोल पानमंद, सरपंच संघमित्रा नाईकनवरे,पोलिस पाटील तृप्ती मांडेकर, उपसरपंच तुळसाबाई घाटे,चेअरमन दीपक मांडेकर यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मोहिते पुढे म्हणाले की,सर्वसामान्य नागरिकांना कोणी त्रास देत असेल तर त्यांची दादागिरी खपवून घेणार नाही. म्हाळूगे रस्त्यासाठी तीन कोटी दिलेत अजून ४७ लक्ष देत आहे. शरीरात रक्त वाहिन्यांप्रमाणे व्यवहारात रस्त्याला किंमत आहे. भविष्यात आंबेठाण ते बोरदरा रस्ता करणार असून भाम फाट्यावर पीएमआरडीए रस्त्याच्या ठिकाणी सिग्नल बसविणार आहे.नवलाख उंबरे ते चाकण फेज ५ पर्यंत होणारी रेल्वे फायदेशीर ठरणार आहे.एमआयडीसी भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी भामा आसखेड धरणावरून अजून एक पाणी योजना राबविण्यात येणार आहे.शिवाय नाशिक फाटा ते चांडोली आणि तळेगाव ते शिक्रापूर उड्डाणपूल होणार असून त्यामुळे या भागाचा चेहरा मोहरा बदलणार आहे.

प्रस्ताविक सोसायटी संचालक संतोष मांडेकर यांनी तर आभार माजी उपसरपंच शांताराम चव्हाण यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही

SCROLL FOR NEXT