Landslide sakal
पुणे

पुणे-पानशेत रस्त्यावरील विघ्ने थांबेनात; संरक्षक भिंतीसह दरड कोसळून वाहतूक ठप्प

पुणे-पानशेत रस्त्यावरील ओसाडे व सोनापूर या गावांच्या शिवेवर मुख्य रस्त्यावर खाजगी जागा मालकाने डोंगर उतारावर बांधलेली संरक्षक भिंत व दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली.

निलेश बोरुडे

पुणे-पानशेत रस्त्यावरील ओसाडे व सोनापूर या गावांच्या शिवेवर मुख्य रस्त्यावर खाजगी जागा मालकाने डोंगर उतारावर बांधलेली संरक्षक भिंत व दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली.

सिंहगड - पुणे-पानशेत रस्त्यावरील ओसाडे व सोनापूर या गावांच्या शिवेवर मुख्य रस्त्यावर खाजगी जागा मालकाने डोंगर उतारावर बांधलेली संरक्षक भिंत व दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने दरड हटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अजय भोसले यांनी दिली आहे.

ओसाडे व सोनापूर या गावांच्या शिवेवर खाजगी जागा मालकाने मुख्य रस्त्याला समांतर अशी डोंगर उतारावर संरक्षक भिंत बांधलेली होती. त्यात आतल्या बाजूने माती भरण्यात आलेली असल्याचे स्थानिकांनी सांगितले. परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने माती फुगुन भिंत पडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भिंतीचे अवशेष, मुरुम, माती हे सर्व मुख्य रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. शनिवार असल्याने मोठ्या प्रमाणात आलेले पर्यटकही अडकून पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटविण्याचे काम सुरू केले आहे. स्थानिक मात्र अवैध उत्खनन व बांधकामांमुळे अशा घटना घडत असल्याचा व प्रशासन जाणीवपूर्वक अशा बेकायदेशीर गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आहेत.

जवळच खचलेला आहे पूल

ज्या ठिकाणी ही दरड कोसळली आहे तेथून जवळच काही दिवसांपूर्वी पूल खचलेला आहे. अत्यंत धोकादायक स्थितीत असलेल्या पुलावर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती दुरुस्ती केली आहे मात्र पाऊस सुरू असल्याने धोका कायम आहे. पुलाच्या ठिकाणी एक जेसीबी मशीन आपत्कालीन मदत व बचाव कार्य करण्यासाठी रात्रंदिवस उभे ठेवण्यात आले आहे.

'अनेक धनडांडग्यांनी रस्त्याच्या कडेने डोंगरावरील जागा खरेदी करून उत्खनन केलेले आहे. त्याचाच हा परिणाम असून प्रशासन अशा लोकांवर का कारवाई करत नाही? संपूर्ण रस्त्याच्या कडेने हे उत्खनन व बांधकाम असल्याने धोका निर्माण झालेला आहे.'

- लहु निवंगुणे, नागरिक, आंबी.

'आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य करण्यासाठी एक जेसीबी मशीन त्याच परिसरात उभे ठेवलेले आहे. त्यामुळे तातडीने रस्त्यावरील दगड-माती हटविण्याचे काम सुरू झाले आहे. लवकरच रस्त्यावरील वाहतूक सुरू होईल. रस्त्याच्या कडेला डोंगर उतारावर असलेली संरक्षक भिंत कोसळल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. रस्त्याच्या कडेने कोणी उत्खनन व धोकादायक बांधकाम केलेले असल्यास त्यांचे सर्वेक्षण करुन त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे‌.'

- अजय भोसले, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT