Pune - कात्रज-कोंढवा रस्त्यावरील पॅरामाउंट एरॉस व पॅरामाउंड गार्डन सोसायटीलगत असणाऱ्या आरक्षित जागेत अतिक्रमण विभागाच्या डंपिग ग्राउंडचा सभासदांना नाहक त्रास होत आहे. निवासी सोसायटीशेजारी असणारे डंपिंग हटविण्याची सातत्याने मागणी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने संतप्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
मालमत्ता विभाग आणि अतिक्रमण विभाग मात्र, एकमेकांवर ढकलाढकल करुन उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांमध्येच ताळमेळ नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
परामाउंट एरॉस सहकारी गृहरचना संस्था व परामाउंट गार्डनमध्ये एकूण २६० सदनिकाधारक आहेत. गेल्या सहा वर्षांपासून ही आरक्षित जागा मालमत्ता विभागाच्या ताब्यात आहे. त्या ठिकाणी अतिक्रमण विभागाने कारवाईत उचललेल्या हातगाडीसह विविध वस्तू ठेवण्यात आल्या आहे. यामध्ये टायर, जुन्या गाड्यांच्या पार्टसह जिवंत गॅस सिलिंडरचाही समावेश आहे.
शेकडोंच्या संख्येने असलेल्या या भंगार सामानामुळे याठिकाणी डंपिंग ग्राउंड झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण झाले आहे. पावसाळ्यात डास, माशांचा प्रादुर्भाव होतो. उंदीर व घुस यांचा त्रास वाढला आहे. अनेकवेळा विषारी सर्प देखील आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोठ्या अपेक्षेने याठिकाणी घर खरेदी केले मात्र, महापालिकेच्या या कारभारामुळे अपेक्षाभंग झाला असून नियमित कर भरणाऱ्या नागरिकांशी पालिका प्रशासन असे कसे वागू शकते? असा प्रश्न सोसायचीचे रहिवाशी सुनिल वाडेकर यांनी केला आहे.
आरक्षित जागेवर अतिक्रमण विभागाने डम्पिंग ग्राउंड केले असून उंदीर, घुस व सर्प निघतात. सोसायटी सभासदांना डासांचा मोठा त्रास होतो. अतिक्रमण विभागाने या ठिकाणी असलेले साहित्य निवासी क्षेत्राबाहेर हलवावे अशी मागणी सभासदांकडून गेली अनेक वर्षे सुरू आहे. मात्र प्रशासन केवळ दुर्लक्ष करत आहे. -
आशुतोष परदेशी, प्रशासक पॅरामाउंट-एरॉस सोसायटी
मालमत्ता विभागाशी संपर्क करुन याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. नागरिकांना त्रास होत असेल तर याची पाहणी करुन निर्णय घेण्यात येईल. -
माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण विभाग
याठिकाणी अतिक्रमण विभागाने डंपिंग केले असून त्याचा मालमत्ता विभागाशी संबंध नाही. त्यामुळे ज्यांनी हे डंपिंग केले आहे, त्यांच्याशी नागरिकांनी संपर्क करावा. -
धनाजी घागरे, कनिष्ठ अभियंता, मालमत्ता विभाग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.