Footpath Encroachment Sakal
पुणे

Pune Footpath : पदपथावर स्टॉल आणि दुचाकीमुळे पादचाऱ्यांचा जीव धोक्यात

शिवाजीनगर येथील संत ज्ञानेश्वर पादुका चौक ते वडारवाडी या रस्त्याच्या दुतर्फा पदपथावर पथारीधारकांचे अनेक अनाधिकृत स्टॉल वाढले.

समाधान काटे

शिवाजीनगर येथील संत ज्ञानेश्वर पादुका चौक ते वडारवाडी या रस्त्याच्या दुतर्फा पदपथावर पथारीधारकांचे अनेक अनाधिकृत स्टॉल वाढले.

शिवाजीनगर - शिवाजीनगर येथील संत ज्ञानेश्वर पादुका चौक ते वडारवाडी या रस्त्याच्या दुतर्फा पदपथावर पथारीधारकांचे अनेक अनाधिकृत स्टॉल वाढले असून जवळपास असलेल्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या व इतर नागरिकांच्या दुचाकी पदपथावर लावलेल्या असतात.

वडारवाडी भागात अनेक कष्टकरी नागरिक, विद्यार्थी राहतात. या नागरिकांना, विद्यार्थ्यांना वडारवाडी, मॉडेल कॉलनी, सेनापती बापट रस्ता, गोखलेनगर,पांडवनगर या भागात जावे लागते. मात्र पदपथावरील अतिक्रमण, लावलेल्या दूचाकी यामुळे चालणे अवघड होत आहे. दुतर्फा गाड्या लावलेल्या असतात आणि रस्त्याच्या मध्यभागी वाहतूक कोंडी होते. रस्त्याच्या बाजूला असलेल्या महाविद्यालयात पार्किंगची सुविधा असताना देखील पदपथावर दूचाकी लावल्या जातात.

'दिपबंगला, गोलंदाज, ज्ञानेश्वर पादुका चौका पर्यंत वाहतूकीसाठी रस्ता असुन या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी केली जातात. पदपथावर दूचाकी लावलेल्या असतात. पादचाऱ्यांना चालणे अवघड झालं आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सम, विषय पार्किंग सुविधा करायला हवी.'

- रमेश भंडारी रहिवाशी वडारवाडी

'ज्ञानेश्वर पादुका चौक ते मंजाळकर चौक या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेज मधील विद्यार्थी व सहस्त्रबुद्धे महाराजांच्या दर्शनासाठी आलेले तसेच काही बांधकाम व्यावसायिकांचे ट्रक व टू व्हीलर लागल्याने फुटपाथ व येण्या- जाण्याचा मार्गात अडथळे निर्माण होत असल्याने कामगार वर्ग, विद्यार्थी व स्थानिक नागरिकांना याचा त्रास होतो.'

- तुषार भिसे रहिवाशी पांडवनगर

'बाहेर गाड्या पार्किंग करण्यासाठी आम्ही कोणालाही सांगत नाही. दुचाकी पार्किंगची व्यवस्था महाविद्यालयाच्या आवारात आहे. बाहेर गाडी लावायची काही गरज नाही. पार्किंग व्यवस्थापन खर्च म्हणून थोडी रक्कम घेतली जाते. त्यामुळे मुलं गाडी बाहेर लावतील असं काही नाही. त्याचं वेगळं कारण असू शकतं.'

- शरद कुंटे अध्यक्ष डेक्कन एज्युकेशन सोसायटी.

संबंधित ठिकाणी पाहणी करून कारवाई केली जाईल.

- बाबासाहेब कोळी पोलीस निरीक्षक चतुःश्रृंगी वाहतूक विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

ACMC Solar Holding : एसीएमसी सोलर होल्डिंग्सच्या आयपीओकडून गुंतवणुकदारांची निराशा, शेअर्स 13% डिस्काउंटवर लिस्ट...

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

SCROLL FOR NEXT