Pune News Esakal
पुणे

Pune News : ‘पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवू’ अशी धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या!

पुणे रेल्वे स्टेशनला उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती

सकाळ डिजिटल टीम

पुणे रेल्वे स्टेशनला उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. पुणे रेल्वे स्टेशनवर डॉग स्कॉड, बॉम्ब शोध पथक, पोलीस यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला, पोलीस आसपास होणाऱ्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन होते. रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवण्यात आली होती. प्रवाश्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले होते, हा फोन कोणी केला धमकी देणाऱ्या इसमाचा शोध घेत त्याला अटक करण्यात आली आहे.

काल मध्यरात्री एका इसमाने कॉल करून मळवली ते काने स्टेशन दरम्यान बॉम्बस्फोट घडून येईल ही माहिती दिली. या फोननंतर लोहमार्ग पोलीस स्टेशनने आसपासच्या ठिकाणी तपासणी सुरू केली. त्यानंतर पुणे रेल्वे स्टेशनमध्ये रात्री 8:00 वा दरम्यान दहशत हल्ला करण्यात येईल अशी माहिती मिळताच, लोहमार्ग पोलीस जीआरपीएफ व स्थानिक पोलीस व श्वान पथकाच्या मदतीने पुणे रेल्वे स्टेशन येथे कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आली होती.

हे ही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

तर हा फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्या व्यक्तिचं नाव गोविंद भगवान मांडे वय 38 आहे. हा मूळचा परभणीचा आहे. मागील 1 महिन्यापासून कात्रज येथे वॉचमनची नोकरी करत होता. तर त्याने गाडी मनमाड स्टेशन येथे जास्त वेळ थांबली. आणि बोगीमध्ये एका पॅसेंजरशी वाद झाला होता. त्यामुळे तो राग मनात धरून होक्सकॉल केला आहे. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, हा धमकीचा फोन कुणी केला? कुठून आला? याचा तपास सुरू होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, पोलिसांनी वर्दळीच्या या रेल्वे स्थानकाची सुरक्षा अधिक वाढवली असून प्रत्येकाच्या हालचालीकडे लक्ष ठेवलं जात होतं. तसेच रेल्वे प्रशासनही अलर्ट मोडवर आलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SA vs IND 1st T20I: संजू सॅमसनचं वादळी शतक, पण नंतर दक्षिण आफ्रिकेचं पुनरागमन; तरी भारत २०० धावा पार

Champions Trophy 2025 : BCCI पाकिस्तानात न जाण्यावर ठाम; PCB म्हणते लेखी द्या, मग बघतोच...! IND vs PAK यांच्यात 'वॉर' जोरदार

SCROLL FOR NEXT