rescue team save animal 
पुणे

Pune Flood Viral Video: माझ्या 14 श्वानांना वाचवा तेव्हाच...पुरात अडकलेल्या महिलेचा हट्ट रेस्क्यू टीमने कसा पूर्ण केला? पाहा व्हिडिओ

कार्तिक पुजारी

पुणे- भूतदया दाखवा असं आपण पुस्तकात वाचलं असेल किंवा स्वत: काही प्रमाणात केली देखील असेल. पण, खरी भूतदया काय असते हे दाखवणारी एक घटना आपल्याला पिंपरी-चिंडवडमध्ये घडली आहे. मुसळधार पावसामुळे घरात अडकलेल्या एका महिलेने रेस्क्यू टीमला फोन केला होता. पण, तिने तिच्यासोबत असलेल्या प्राण्यांना बाहेर काढल्याशिवाय स्वत: बाहेर येण्यास नकार दिला होता.

पुण्यात एक दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाला होता. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं. काही ठिकाणी तर पार छातीपर्यंत पाणी आलं होतं. पिंपरीच्या मार्केटमध्ये देखील अशीच स्थिती होती. याच भागात राहणाऱ्या महिलेच्या घरात पाणी शिरलं होतं. महिलेने रेस्क्यू टीमला फोन केला होता. पण, जेव्हा रेस्क्यू टीम आली तेव्हा महिलेने बाहेर येण्यास नकार दिला.

महिलेने पाणी वाढू लागल्यानंतर १५ प्राण्यांना ( १४ कुत्रे आणि १ मांजर) एका खोलीमध्ये ठेवलं होतं. महिला देखील प्राणीप्रेमी असल्याच कळतंय. RESQ चॅरिट्रेबल ट्र्स्टची टीम जेव्हा महिलेला वाचवण्यासाठी आली तेव्हा महिलेने स्पष्ट सांगितलं की, जोपर्यंत या सर्व प्राण्यांना वाचवलं जात नाही तोपर्यंत ती सोबत येणार नाही. महिला अडून बसल्यामुळे रेस्क्यू टीमचा नाईलाज झाला.

RESQ चॅरिट्रेबल ट्र्स्टच्या टीमने मोठ्या धाडसाने एक-एक करून सर्व प्राण्यांना पाण्यातून वाट काढत बाहेर काढले. यांसदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. नेहा पंचामिया यांनी हा व्हिडिओ एक्सवर ट्वीट केला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एकएक करून सर्व १४ कुत्रे आणि १ मांजर यांना वाचवण्यात येतं. रेस्क्यू टीम छातीपर्यंत पाण्यात उतरून प्राण्यांना वाचवत असल्याचं दिसतंय. त्यांच्या या कामासाठी त्यांचे कौतुक केलं जात आहे. सर्व प्राणी सुखरुप असल्याची खात्री झाल्यानंतर शेवटी महिला बाहेर येण्यास तयार झाली.

दरम्यान, पुण्यामध्ये एक दिवसापूर्वी पावसाने हाहाकार माजवला होता. संपूर्ण शहर विस्कळीत झालं होतं. एनडीआरएफची टीम मैदानात उतरली होती. पुण्यातील पावसामुळे सहा ते सात जणांचा जीव गेला आहे. सध्या पाणी ओसरू लागलं आहे. तरी काही ठिकाणी पाणी साचून आहे.अनेक कुटुंबाचे यामुळे नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Accident: भीषण दुर्घटना! जालना-वडीगोद्री मार्गावर एसटी बस अन् ट्रकची टक्कर, ५ जणांचा मृत्यू

ही वाट्टेल तशी खेळते आणि... मीरा जग्गनाथने अंकितावर साधला निशाणा; पण नेटकऱ्यांनी घेतली तिचीच शाळा

ENG vs AUS 1st ODI : २५ चेंडूंत ११० धावा! Travis Head ला रोखणं झालंय अवघड; ख्रिस गेल स्टाईल सेलिब्रेशन

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; निफ्टी 25,500च्या वर, मिडकॅप निर्देशांक तेजीत

Assembly Election : राजू शेट्टी, संभाजीराजेंसमोर 'होमपीच'वरच आव्हान; उमेदवार ठरवताना तिसऱ्या आघाडीची लागणार कसोटी

SCROLL FOR NEXT