Pune Power Supply News sakal
पुणे

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये पहाटेपासून बत्ती गूल

लोणीकंद ते चाकण दरम्यानच्या महापारेषणच्या विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लोणीकंद ते चाकण दरम्यानच्या महापारेषणच्या विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने आज पहाटेपासून पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश भागाची बत्ती गूल झाली. त्यामुळे पुणे शहरातील पेठांचा भाग आणि सिंहगड रस्ता भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. लोणीकंद ते चाकण दरम्यान महापारेषणाती मोठी वीज वाहिनी आहे. त्यामध्ये बिघाड झाल्याने पहाटेपासून वीज बंद आहे. पुढील काही तासात वीज पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे. (Pune Electricity News)

वीज पुरवठा खंडीत झाल्याने पुण्यात हडपसर, कोंढवा, कात्रज, धायरी, स्वारगेट, बाणेर, कोथरूड शिवाजीनगर रस्ता रोड फाटा रोड आजचा भाग वडगाव शेरी चंदन नगर टिंगरे नगर येरवडा यासह सर्वच भागातील वीजपुरवठा पहाटेपासून खंडित झालेला आहे पिंपरी-चिंचवड शहरातील पहाटेपासून वीज गेलेले आहे. (Pune Power Supply News)

पहाटेपासून वीज नसल्याने ऑफिसला जाणार्‍या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे सोसायटीतील टाक्या नवीन पाने चढवणे शक्य नसल्याने अनेकांची अडचण झाली आहे पुणे महापालिकेचा वडगाव केंद्रातील पंपींग चे काम विजेअभावी ठप्प झालेली आहे त्यामुळे सिंहगड रस्ता भाग कात्रज सकाळी भाग येथे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे तसेच पेठांमधील कमी दाबाने पाणी येते तेथे मोटारीने पाणी सोडावे लागते पण पहाटेपासून वीज नसल्याने या भागातील पाण्याची अडचण निर्माण झाली आहे अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे सांगण्यात आले आहे दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याने पिंपरी चिंचवड मधील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही महत्वाच्या ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये ५ ठिकाणी बुधवारी (दि. ९) पहाटे ४.३०च्या सुमारास बिघाड (ट्रीपिंग) झाला. त्यामुळे कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी व चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात सकाळी ६ वाजेपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे.

अतिशय दाट धुके व दवं यामुळे या टॉवर लाईन मध्ये बिघाड झाल्याची शक्यता असल्याचे महापारेषणकडून सांगण्यात आले. तसेच महत्वाचे दोन ४०० केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्र बंद असल्याने पर्यायी वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान महावितरणकडून याबाबतची माहिती वीज ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे देण्यात येत आहे.

महापारेषणचे सर्व वरिष्ठ अभियंता सध्या टॉवर लाइनमधील बिघाड शोधण्यासाठी युद्धपातळीवर पेट्रोलिंग करीत आहेत. सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागू शकतो. सकाळी ११ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होऊ शकेल. या कालावधीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT