पुणे

Pune Mahametro : पुणे, पिंपरी-चिंचवड आता होणार वेगवान

पुणेकरांना दिलासा मिळेल तो मेट्रोमुळे. स्वतःचे वाहन वापरण्यापेक्षा २५ ते ३० मिनिटांत आणि परवडणाऱ्या तिकीटदरात मेट्रोतून शहराच्या मध्य भागात सहजपणे ये-जा करता येईल.

सकाळ वृत्तसेवा

मंडई, तुळशीबाग, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता ही पुणेकरांची जिव्हाळ्याची ठिकाणे. जग फिरून झाले, इंटरनेटवर बक्कळ खरेदी केली, तरी या ठिकाणांना वरचेवर भेट दिल्याशिवाय पुणेकरांच्या जिवाला चैन पडत नाही; पण गेल्या दहा वर्षांत वाहतूक कोंडीची समस्या इतकी बिकट होत गेली, की या भागात येणे-जाणे त्रासदायक ठरले. वाहतूक कोंडी आणि पार्किंग या दोन समस्यांनी मध्य पुण्याला वेढले.

आता यातून पुणेकरांना काहीसा दिलासा मिळेल तो मेट्रोमुळे. स्वतःचे वाहन वापरण्यापेक्षा २५ ते ३० मिनिटांत आणि परवडणाऱ्या तिकीटदरात मेट्रोतून शहराच्या मध्य भागात सहजपणे ये-जा करता येईल. वाहतूक कोंडीत अडकलेल्या मध्य पुण्याची प्रतिमाही बदलेल आणि पुण्याला आणखी वेग येईल, अशी आशा मेट्रोमुळे पल्लवित झाली आहे!

विस्तारित मार्गांचा या भागाला होणार फायदा

वनाज - गरवारे कॉलेज ते रूबी हॉल क्लिनिक

वनाज, शिवतीर्थनगर, शास्त्रीनगर, केळेवाडी, एरंडवणे, कर्वे रस्ता, डेक्कन जिमखाना, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, शनिवार पेठ, नारायण पेठ, महापालिका भवन, आरटीओ, पुणे रेल्वे स्टेशन आदी

वनाजवरून आता थेट डेक्कन जिमखाना, संभाजी उद्यान, बालगंधर्व, महापालिका भवन, आरटीओ, पुणे रेल्वे स्टेशन, ससून रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सेंट्रल बिल्डिंग, रूबी हॉल परिसरात पोहचणे शक्य.

वनाजवरून शिवाजीनगर न्यायालय स्थानकात मेट्रो बदलून पिंपरी-चिंचवडच्या दिशेनेही पोहोचणे शक्य

पिंपरी-चिंचवड - फुगेवाडी - शिवाजीनगर न्यायालय

  • पिंपरी-चिंचवड, काळेवाडी, नाशिक फाटा, फुगेवाडी, बोपोडी, खडकी, रेंजहिल्स, कृषी महाविद्यालय आदी

  • पिंपरी-चिंचवडवरून पुणे रेल्वे स्टेशन, तसेच शिवाजीनगर न्यायालय स्थानकातून मेट्रो बदलून, महापालिका भवन, संभाजी उद्यान, डेक्कन जिमखान्यापर्यंत पोचणे सहज शक्य

  • पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांना मध्य पुण्यात पोचणे सहज शक्य

  • विद्यार्थ्यांना ३० टक्के सवलत

  • शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ओळखपत्राद्वारे तिकीट दरात ३० टक्के सवलत मिळणार

  • सर्व नागरिकांना दर शनिवार- रविवारी तिकीट दरात ३० टक्के सवलत मिळणार

या घटकांना होणार फायदा

सेंट्रल बिल्डिंग, आरटीओ, पुणे रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी जाणाऱ्या, तसेच डेक्कन जिमखाना, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता या परिसरात जाणाऱ्या नागरिकांची सोय

शिवाजीनगर न्यायालय स्थानक -

  • १९ सरकते जिने व ८ लिफ्ट

  • जमिनीखाली १०८ फूट

  • प्लॅटफॉर्मवर सूर्यप्रकाश पडेल असे बांधकाम

  • दोन मार्ग एकमेकांना मिळणार

  • भविष्यात हिंजवडी मेट्रोमार्ग शिवाजीनगर स्थानकाला पादचारी पुलाने जोडणार

शिवाजीनगर (रेंजहिल्स) भूमिगत स्थानक -

  • छत्रपती शिवरायांच्या गड-किल्ल्यांसारखी रचना

  • रेल्वे, पीएमपी आणि हिंजवडी मेट्रो तसेच एसटी स्थानक जोडले जाणार

  • ५ लिफ्ट आणि १० सरकते जिने

  • सिमला ऑफिस चौक, शिवाजीनगर एसटी व रेल्वे स्थानक, नारायण पेठ भागाशी जोडले जाणार

  • पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंसारखी सजावट

तिकीट कसे मिळेल

  • प्रवाशांना मेट्रोने प्रवास करण्यासाठी आवश्यक असणारे तिकीट हे स्थानकावरील तिकीट खिडकीवर मिळेल.

  • स्थानकावर तिकीट व्हेंडिंग मशिन उपलब्ध असते. तिथे प्रवाशांना डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे तिकीट काढता येईल.

  • मेट्रोचे महा कार्ड व पुणे मेट्रो ॲपच्या माध्यमातूनदेखील तिकीट काढणे शक्य आहे.

  • ज्या प्रवाशांना व्हाट्सॲपवरून तिकीट काढायचे आहे. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये ९४२०१०१९९० हा क्रमांक सेव्ह करावा

  • व्हाट्सॲपवरून संबंधित क्रमांकावर हाय (hi) असा मेसेज करणे, त्यानंतर बुक तिकीट असा पर्याय येईल.

  • बुक तिकीट हा पर्याय निवडल्यानंतर प्रवासाचा तपशील द्यावा व पेमेंटचे पर्याय निवडावेत

  • पेमेंट केल्यावर क्यूआर कोड येईल, तोच क्यूआर कोड प्रवासाआधी डिस्प्ले बोर्डवर स्कॅन करणे

‘पीएमपी’ची आजपासून फीडर सेवा

  • प्रवाशांना मेट्रोच्या स्थानकावर येण्यासाठी व तेथून जवळच्या भागात जाण्यासाठी पीएमपी प्रशासनाची मंगळवारपासून फीडर सेवा

  • यासाठी सात बसचा वापर होणार

  • शिवाजीनगर न्यायालयापासून तीन बस वर्तुळाकार मार्गावर धावणार

  • दोन बस पिंपरी-चिंचवड स्थानकापासून काळेवाडी फाटा, घरकुल मार्गासाठी

  • नाशिक फाटा ते संतनगर, भोसरी दरम्यान एका बसची सेवा

  • दापोडी ते नवी सांगवी दरम्यान एक बस धावणार

  • या बस दर एक तासाने धावणार

वाटचाल मेट्रोची

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १) गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल क्लिनिक आणि फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यानच्या विस्तारित मेट्रोमार्गाचे उद्घाटन होत आहे. मेट्रोच्या आगमनाने पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडत आहे. वनाज - रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड - स्वारगेट हा संपूर्ण मेट्रोमार्ग या वर्षाच्या अखेरीस कार्यान्वित होणार आहे.

  • २१ नोव्हेंबर २००६ : मेट्रो प्रकल्पासाठी स्थायी समितीकडून ‘दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’ची (डीएमआरसी) नियुक्ती

  • २८ जून २००६ : वनाज-रामवाडी मार्ग महापालिकेने मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला

  • ४ सप्टेंबर २००९ : ‘डीएमआरसी’कडून प्रकल्प अहवालाचे महापालिकेला सादरीकरण

  • २७ जानेवारी २०१० : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडून ‘डीएमआरसी’च्या प्रकल्प अहवालाला मंजुरी

  • २८ जून २०१२ : वनाज-रामवाडी मार्ग मंजुरीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठविला

  • २४ सप्टेंबर २०१२ : पिंपरी-चिंचवड-स्वारगेट मार्गाला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी

  • १४ जानेवारी २०१३ : वाढलेली किंमत लक्षात घेऊन सुधारित मेट्रो अहवाल पाठविण्याचा राज्य सरकारचा पुणे आणि पिंपरी महापालिकेला आदेश

  • २४ जानेवारी २०१३ : दोन्ही महापालिकांकडून सुधारित अहवाल सादर

  • ११ फेब्रुवारी २०१४ : केंद्र सरकारकडून मेट्रो प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी

  • २६ जून २०१४ : प्री-पीआयबीसाठी (सार्वजनिक गुंतवणूक मंडळ) मेट्रो प्रस्ताव दाखल

  • ७ मार्च २०१५ : मार्गावरील आक्षेपाबाबत गिरीश बापट समिती नियुक्ती

  • २० एप्रिल २०१५ : बापट समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर

  • १ डिसेंबर २०१५ : बापट समितीच्या शिफारशींनुसार बदल करून राज्य सरकारने केंद्राला मेट्रो प्रस्ताव पाठविला

  • १४ नोव्हेंबर २०१६ : ‘पीआयबी’ची दिल्लीत बैठक, मेट्रो प्रकल्पाला मंजुरी, अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे सादर

  • २४ डिसेंबर २०१६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील ३१ किलोमीटरच्या मेट्रोमार्गाचे ऑनलाइन भूमिपूजन

  • १ जानेवारी २०१७ : मेट्रोच्या मुख्य कार्यालयाचे काम सुरू

  • ११ जुलै २०१७ : नाशिक फाटा येथे पुणे मेट्रोच्या पहिल्या पिलरच्या पायाभरणीचे काम पूर्ण

  • २५ ऑक्टोबर २०१७ : वल्लभनगर जवळील पुणे मेट्रोच्या पहिल्या पिलरचे काम पूर्ण

  • ११ मार्च २०१८ : पौड रस्त्यावर पहिल्या पिलरचे काम पूर्ण

  • १७ नोव्हेंबर २०१९ : भुयारी मेट्रोसाठी टनेल बोअरिंग मशिन पुण्यात दाखल

  • २५ डिसेंबर २०१९ : भुयारी मेट्रोचे काम सुरू

  • ऑगस्ट २०२० : वनाज ते रामवाडी दरम्यान एलिव्हेटेड मेट्रोच्या खांबांची उभारणी पूर्ण

  • नोव्हेंबर २०२० : वनाज-गरवारे मार्गावर गर्डरचे काम पूर्ण

  • मार्च २०२१ : लोहमार्ग टाकण्याचे काम पूर्ण

  • एप्रिल २०२१ : सिग्नलिंग, टेलिकम्युनिकेशन सिस्टीम उभारणीस प्रारंभ

  • जून २०२१ : ११ स्थानकांची उभारणी पूर्ण

  • ३० जुलै २०२१ : मेट्रोची पाच किलोमीटरची ट्रायल रन पूर्ण

  • नोव्हेंबर २०२१ : वनाज-गरवारे दरम्यानची बहुतांश कामे पूर्ण

  • ६ मार्च २०२२ : वनाज- गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी चिंचवड- फुगेवाडी मेट्रोमार्गांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

‘सकाळ’ची आग्रही भूमिका

मेट्रोतून प्रवास करण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी पुणेकरांना एका दशकापेक्षा जास्त कालावधीची वाट पहावी लागली. या प्रकल्पात अनेक अडचणीही आल्या. मात्र, पुणेकरांची भावना लक्षात घेऊन ‘सकाळ’ने मेट्रो लवकर धावली पाहिजे, यासाठी आग्रही भूमिका घेत पाठपुरावा केला. या प्रकल्पाचा आढावा घेणारी विशेष पुरवणी ‘सकाळ’ने १८ जून २०१० रोजी प्रसिद्ध केली होती. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मेट्रोची आवश्‍यकता का आहे, मेट्रोचा मार्ग कसा असेल आणि या प्रकल्पाचे नेमके नियोजन कसे असेल, आदींबाबतचा आढावा या पुरवणीत घेण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT