Pune Metro Work sakal
पुणे

पुणे- पिंपरीतील मेट्रोतून फिरा अवघ्या १०- २० रुपयांत !

दोन्ही शहरांतील मेट्रो मार्गांची तयारी पूर्ण; आता प्रतीक्षा उदघाटनाची

मंगेश कोळपकर : सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातून सुरू होणाऱ्या मेट्रोमधून पुणेकरांना अवघ्या १० आणि २० रुपयांत ६ मार्चपासून प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे. शहरातील वनाज- गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी चिंचवडमधील पिंपरी -फुगेवाडी दरम्यान पहिल्या टप्प्यातील मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते ६ मार्च रोजी होणार आहे. त्यानंतर मेट्रोमधून लगेचच नागरिकांना वाहतूक करता येईल.

शहरातील वनाज, आनंदनगर, आयडीयल कॉलनी, नळस्टॉप आणि गरवारे महाविद्यालय ही स्थानके प्रवाशांसाठी ६ मार्चपासून खुली होणार आहेत. त्यातील एक्सलेटर, लिफ्ट, साफसफाई आदीं सर्व कामे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान मोदी मेट्रोतून एक फेरी मारतील, असे गृहित धरून महामेट्रोने तयारी सुरू केली आहे. पहिल्या तीन स्थानकांसाठी प्रवासासाठी १० रुपये तर पुढील टप्प्यासाठी २० रुपये शुल्क असेल.

पिंपरी चिंचवडमध्येही हेच सूत्र कायम राहणार आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील प्रवाशांना १० आणि २० रुपयांत मेट्रोतून प्रवास करता येईल. त्याचवेळी महामेट्रोच्या माध्यमातून सायकलीही भाडेतत्त्वावर उपलब्ध होणार आहेत. त्यासाठीचीही तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनीही दोन्ही मेट्रो मार्गांची पाहणी केली आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक सुरू करण्याची प्रक्रिया आता उदघाटनानंतर लगेचच होईल.

वेळापत्रक अंतिम टप्प्यात

दोन्ही शहरांतील मेट्रोच्या वाहतुकीचे वेळापत्रक तयार कऱण्याची प्रक्रिया महामेट्रोकडून सुरू आहे. सकाळी ८ वाजल्यापासून ही वाहतूक सुरू होईल. त्याची वारंवारिता १५ -२० मिनिटे असू शकेल. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन मेट्रोचे वेळापत्रक अंतिम होणार आहे. त्यामुळे त्यात बदलही होऊ शकतो. मेट्रोला तीन डबे असतील. त्यातील एक डबा प्रवासी महिलांसाठी राखीव असेल. तिन्ही डब्यांतून सुमारे १ हजार प्रवासी एका वेळेस वाहतूक करू शकतात, असे महामेट्रोच्या सूत्रांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT