प्लॉगिंग ड्राईव्ह Sakal
पुणे

प्लास्टिक संकलनासाठीची ‘प्लॉगिंग ड्राईव्ह’ चळवळ थेट इंग्लंडपर्यंत

पुण्यातील काही तरुणांनी पुढाकार घेत प्‍लॅस्टिक संकलनासाठी ‘प्लॉगिंग ड्राईव्ह’ या अनोख्या उपक्रमाची सुरवात केली होती.

अक्षता पवार

पुणे : प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन ही जागतिक स्तरावर मोठी समस्या आहे. यावर तोडगा म्हणून पुण्यातील काही तरुणांनी पुढाकार घेत प्‍लॅस्टिक संकलनासाठी ‘प्लॉगिंग ड्राईव्ह’ या अनोख्या उपक्रमाची सुरवात केली होती. ‘प्लॉगिंग’ची ही चळवळ आता थेट इंग्लंडमधील ब्रिस्टल शहरापर्यंत पोचली आहे. प्लॉस्टिक कचऱ्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी मराठी तरुणाने सुरू केलेल्या चळवळील परदेशात देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे.

दैनंदिन वापरातून पर्यावरणात आढळणाऱ्या प्लॉस्टिकच्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्‍हावे म्हणून २६ वर्षीय विवेक गुरव या तरुणाने शहरातील प्लॉस्टिक कचऱ्याच्या संकलनाचे काम सुरू केले. सुरवातीला विवेकला कबाडीवाला, कचरेवाला असे लोकं म्हणायचे. मात्र हळू-हळू लोकांना ही त्याच्या कामाबाबत समजत गेले आणि ‘प्लॉगर’ म्हणून त्याने स्वतःची नवी ओळख निर्माण केली. तसेच प्लॅस्टिकमुक्त शहरासाठी ‘पुणे प्लॉगर्स’ या संस्थेची स्‍थापना केली. पुण्यातील हा प्रयोग पाहता इतर शहरातील तरुणांनी देखील यात सहभाग घेतला असून या उपक्रमात देशासह परदेशातून सुमारे १० हजार स्‍वयंसेवक जोडले गेले आहेत.

याबाबत विवेक याने सांगितले, ‘‘गेल्या दोन वर्षांपासून प्लॉगिंग ड्राईव्ह करण्यात येत आहे. आतापर्यंत एक हजार टन इतक्या प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन करण्यात आले आहे. त्यात कोरोनानंतर पार्सल, ऑनलाइन खरेदी, घरगुती कार्यक्रम आदींमुळे प्लॅस्टिक कचऱ्‍याचे प्रमाण ही वाढले होते. अशा कचऱ्याचे व्यवस्थापन व त्‍यावरील प्रक्रिया वेळेत व्‍हावी म्हणून हा प्रयत्न संस्थेद्वारे केला जात आहे. पर्यावरण संरक्षणासाठी आवड असल्यामुळे सोफ्टवेअर इंजिनिअरिंगची नोकरी सोडून पर्यावरण या विषयात पुढे शिक्षण घेण्याचे ठरविले.

यासाठी मला ब्रिस्टल विद्यापीठात पर्यावरणीय धोरण आणि व्यवस्थापन विषयातील पदवीयुत्तर पदवीसाठी मला ब्रिस्टन विद्यापिठातून संधी मिळाली. येथे शिक्षण घेताना पुणे प्लॉगिंगच्या मॉडल बद्दल सांगितले, आणि त्यातून ब्रिस्टल येथे ‘३० डेज प्लॉगिंग चॅलेंज’ची सुरवात झाली. यामध्ये शहरातील प्लॅस्टिक कचरा संकलीत करून तो पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात येत आहे. तर ‘३० डेज प्लॉगिंग चॅलेंज’च्या माध्यमातून ब्रिस्टन येथे ५४०० किलोग्रॅम इतक्या प्‍लॅस्टिक कचऱ्याचे संकलन करण्यात आले. या उपक्रमात ३० हून अधिक जणांनी सहभाग घेतला होता.’’

विविध शहरांमध्ये ‘प्लॉगिंग’ ः

‘पुणे प्‍लॉगर्स’ चा आदर्श घेत राज्यातील इतर शहरांमध्ये ही ‘प्‍लॉगिंग ड्राईव्ह’च्या माध्यमातून प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन करण्यात येत आहे. यामध्ये नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, अकोला, नगर आदी शहरांचा समावेश आहे.

प्लॉगिंग ड्राईव्ह बाबत :

- प्लॉगिंग चळवळीच्या माध्यमातून आतापर्यंत एक टन प्‍लॅस्टिक कचऱ्याचे संकलन

- संस्थेच्या वतीने ५०० ‘प्लॉगिंग ड्राईव्ह’च्या मोहिमा राबविण्यात आल्या

- देशातील एकूण २२ शहरांमध्ये आणि इंग्लंड मध्ये मोहिमा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT