Ravindra Dhangekar  
पुणे

Pune Porsche Accident: योग्य तपास केला म्हणता, मग 2 पोलीस दोषी कसे?; वसुलीचा खेळ....; रवींद्र धंगेकरांचा आयुक्तांवर आरोप

Ravindra Dhangekar On Pune Porsche Accident : कसब्याचे आमदार आणि काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांनी यावरुन पुण्याच्या आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले आहे.

कार्तिक पुजारी

पुणे- शहरातील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातात एका अल्पवयीन मुलामुळे दोघांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण चांगलंच तापत आहे. शिवाय या प्रकरणी दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. प्रकरणाला राजकीय वळण देखील मिळताना दिसत आहे. कसब्याचे आमदार आणि काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांनी यावरुन पुण्याच्या आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले आहे.

पुणे अपघात प्रकरणात येरवाड्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलबंन करण्यात आले आहे. कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. रविंद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्तालयास`मोर ठिय्या आंदोलन केले होते. दोषींवर कारवाई करावी अशी त्यांची मागणी होती. दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर धंगेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे.

गेले ६ दिवस आपण सर्व पुणेकरांनी आवाज उठवल्यानंतर आज अखेर या प्रकरणातील २ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आला आहे. मयत अनिश व अश्विनी या दोन्ही मृतांना न्याय देण्याऐवजी त्यांच्या मृत्यूपश्चात "डिल" करत तपासात अक्षम्य चुका करणाऱ्या व हे प्रकरण पद्धतशीर दाबण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सुमारे पाच ते सहा अधिकाऱ्यांपैकी दोन अधिकाऱ्यांचा निलंबन होणे हे या प्रकरणातील पहिले सकारात्मक पाऊल आहे, असं ते म्हणाले.

अगदी सकाळी १२ वाजता घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुणे पोलिसांनी योग्य तपास केला असे ठणकावून सांगणाऱ्या पुणे पोलीस कमिशनर यांना अचानक हे दोन पोलीस अधिकारी दोषी कसे सापडले...? याचे देखील आश्चर्य वाटते, असं धंगेकर म्हणालेत.

त्यांनी त्यांचा हा जो वसुलीचा खेळ सुरू केला आहे, तो इतरत्र कुठे जाऊन करावा. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत पुणे पोलीस दलाची बदनामी होईल असे वर्तन करणाऱ्या कमिशनर यांच्या बदली करावी या मागणीवर मी ठाम आहे, असं ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निफ्टी आणखी 1,000 अंकांनी घसरू शकतो; शेअर बाजारात सातत्याने का कोसळत आहे?

आज नाही जन्मदिन नाही पुण्यतिथी तरीही गुगलने का बनवला सुप्रसिद्ध गायक केके यांचं डुडल ?

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

Firing On School Van: उत्तर प्रदेशात देशाला हादरवणारी घटना! स्कूल व्हॅनवर तरुणांकडून गोळीबार

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर ‘वंचित’ मतांमध्येही आघाडी घेणार का?

SCROLL FOR NEXT