पुणे, ता. ११ : बोपदेव घाटात तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील एका संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर दोन आरोपींनाही ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.
गुन्हे शाखेने एका आरोपीला जिल्ह्यातून, तर इतर दोन आरोपींना नागपूरमधून ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
बोपदेव घाट परिसरात गुरुवारी (ता. ३) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयीन तरुणी मित्रासमवेत फिरण्यास गेली होती. त्यावेळी तीन आरोपींनी तरुणीसह तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत बांबूने मारहाण केली. त्यानंतर तिघांनी तरुणाला शर्ट आणि बेल्टने बांधून तरुणीवर लैंगिक अत्याचार केला.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह तपसपथकातील तीनशेहून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी आरोपींचा शोध घेत होते. या प्रकरणात दोनशेहून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली. पीडित तरुणीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी दोन आरोपींची रेखाचित्रे तयार केली होती. पुणे पोलिसांनी आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
पोलिसांनी घटनेच्या कालावधीत बोपदेव घाटातून प्रवास केलेल्या तीन हजार मोबाइलधारकांची माहिती आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण संकलित केले. या सर्व माहितीच्या आधारे ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तसेच, खासगी सायबर तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली.
ही घटना घडल्यापासून पुणे पोलिसांची 60 पथके आरोपींचा शोध घेत होती, परंतू तरीही आरोपींचा शोध लागत नव्हता. मात्र आता आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.