Lalit Patil Drugs Case Esakal
पुणे

Lalit Patil Drugs Case: मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर पुणे पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये! ललित पाटील प्रकरणी दोन महिलांना केली अटक

अंकिता खाणे (Ankita Khane)

ललित पाटील ड्रग्ज तस्करी प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन महिलांना अटक केल्याची माहिती आहे. या दोन महिला ललित पाटीलच्या मैत्रिणी असल्याची माहिती आहे. ललित पाटील ससून रूग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी त्यांच्या संपर्कात होत्या. या दोन्ही महिलांनी त्याला पळून जाण्यासाठी मदत केल्याची माहिती आहे.

ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी काल अटक केल्यानंतर पुणे पोलिस देखील कसून तपास करत आहेत. त्यांनी काल नाशिकमधून दोन्ही महिलांना अटक केली आहे. ललित पाटील पळून गेल्यानंतर तो नाशिकला गेला होता. तो नाशिकला गेला तेव्हा त्याला या महिलांनी पैसै दिले सोबतच त्याची राहण्याची आणि पळून जाण्यासाठी देखील त्यांनी मदत केल्याची माहिती समोर आली आहे.

जमा झालेले पैसे, सोनं हे या दोन महिलांकडे होते अशी माहिती पोलिसांकडे आहे. आज या महिलांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. फरार असल्याच्या काळात तो सातत्याने या दोघींच्या संपर्कात होता.ड्रग्सच्या काळया कमाईतून मिळवलेला पैसा ललित पाटीलने या दोघींकडे ठेवल्याची माहिती आहे. बुधवारी रात्री पोलिसांनी नाशिक शहरातून दोघींनी अटक केली.

"मी पळालो नाही, पळवण्यात आलं"- ललित पाटील

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी चेन्नई इथून अटक केली. यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आलं. यावेळी मीडियाच्या कॅमेरॅसमोर बोलताना मी ससून रुग्णालयातून पळून गेलो नाही तर मला पळवण्यात आलं, असा खळबळजनक आरोप त्यानं केला आहे.

नाशिकमध्ये ड्रग्जचा कारखाना

दरम्यान, ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील हे दोघे मूळचे नाशिकचे असून त्यांनी त्याठिकाणी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सुरु केला होता. या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापेमारी केल्यानंतर त्या ठिकाणी सुमारे २०० किलो ड्रग्ज आढळून आल्याचा दावा करण्यात आला होता.

तत्पूर्वी ललित पाटील गेल्या नऊ महिन्यांपासून पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार घेत होता. त्यानंतर पोलिसांच्या हातावर तुरी देत तो पळून गेल्याचं सांगितलं जात होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: पुढच्या सामन्यांमध्ये तो असा खेळणार नाही, हीच अपेक्षा, कुलदीप यादव कोणाबद्दल असं बोलून गेला; वाचा

Pune Fire News: पुण्यात नवी पेठेत ग्रंथालयाला भीषण आग! अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

ED Seized PFI Properties: 'पीएफआय'शी संबंधित संस्थांवर ईडीची छापेमारी, ५६ कोटी रुपयांची संपत्ती जप्त

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा पावसाने झोडपले; पाच ठिकाणी कोसळली वीज, लाखो रुपयांचे नुकसान

Baba Siddique Case: बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणात मोठी अपडेट! पोलिस सुरक्षा रक्षक निलंबित

SCROLL FOR NEXT