Lost Pune Police:  sakal
पुणे

Pune Police: बेपत्ता उपनिरीक्षक २४ तासात आढळले सुखरूप, पोलिसांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Pune Latest Update: पत्नीने लोणीकंद पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर चार पथके त्यांच्या शोधासाठी फिरत होती

सकाळ वृत्तसेवा

Vagholi: लोणीकंद पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे उपनिरीक्षक राहुल खंडू कोळपे ( वय ३५ रा. वाघोली ) हे २४ तासानंतर सुखरूप आढळून आले. राहू पिंपळगाव येथून त्यांना पोलीस पथकाने लोणी कंद पोलीस ठाण्यात आणले. तणावातून ते निघून गेले होते.

' पुढील काही काळासाठी मला कोणी कॉल अथवा मेसेज करू नये. ' असे व्हॉटसअप स्टेटस ठेवून ते शुक्रवारी बेपत्ता झाले होते. ते लोणीकंद येथून एका एस टी बस मध्ये बसल्याचे ही कळाले होते. त्यांच्या पत्नीने लोणीकंद पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर चार पथके त्यांच्या शोधासाठी फिरत होती. सोशल मिडीयावरही सर्वत्र मेसेज फॉटवर्ड करण्यात आला होता.

अखेर राहू पिंपळगाव येथून त्यांनीच मित्राला फोन केला. यानंतर ते राहू पिंपळगाव येथे असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. लोणीकंद पोलीस पथकाने त्यांना तेथून लोणीकंद पोलीस ठाण्यात आणले. यावेळी पोलीस उपायुक्त विजय मगर, सहायक पोलिस आयुक्त विठ्ठल लबडे हे पोलीस ठाण्यात होते. त्यांच्याशी बोलणे झाल्यानंतर कोळपे हे घरी गेले. २४ तासातच ते मिळून आल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार! 'वर्षा' निवासस्थानातून मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर

Shahajibapu Patil: काय झाडी काय डोंगर... फेम शहाजीबापू पाटील यांचा पराभव करणा-या युवा आमदाराने केली अनोखी घोषणा

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

SCROLL FOR NEXT