वेताळ टेकडी बचाव कृती समिती' sakal
पुणे

Pune : टेकडी वाचवण्यासाठी राजकीय पक्षांचा पुढाकार

माहिती पत्रक, फ्लेक्स, बैठकांच्या माध्यमातून जनजागृती

समाधान काटे

शिवाजीनगर : शहरातील टेकड्या आपले फुफ्फुसे आहेत, टेकड्या वाचल्या पाहिजेत व निसर्ग देखील जपायला हवा. प्रस्तावित बालभारती ते पौंड रस्ता केल्यावर निसर्गाची हानी होणार आहे. ती भरून काढणं अवघड आहे. यासाठी 'वेताळ टेकडी बचाव कृती समिती'च्या वतीने पर्यावरण वाचवण्यासाठी नागरिकांनी शनिवार ( ता.१५) एप्रिल रोजी सायं पाच वाजता वेताळबाबा चौक, सेनापती बापट रस्ता ते जर्मन बेकरी असे जनजागृती अभियानात राबवण्यात येणार आहे.

या अभियानात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गोखलेनगर भागातील कॉग्रेस , शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) अशा विविध राजकीय पक्षांच्या वतीने केले जात आहे. घरोघरी जाऊन जनजागृतीपर माहितीपत्रक , चौकाचौकात फ्लेक्स, सोशल मिडिया, डिजीटल स्क्रिन गाडी , बैठका अशा विविध माध्यमातून गोखलेनगर, जनवाडी, रामोशी वाडी, पंचवटी, पाषाण, डेक्कन जिमखाना , वेताळ टेकडी या भागातील नागरिकांसमोर जनजागृती केली जात आहे.

" कोणाच्यातरी हट्टापायी झाडं तोडत आहेत. अभ्यासकांनी यावरती केलेलं संशोधन महापालिका अधिकारी बघत नाहीत. रस्ता होऊ शकतो म्हणून, अधिकाऱ्यांनी लोकांना गृहीत धरलं आहे असं दिसतं.या सर्व गोष्टीला आमचा विरोध आहे. टेकडी ही माणसांच्या पुढच्या आयुष्याची गणितं आहेत. पंधरा तारखेच्या मोर्चाला पाठिंबा असून, यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती देखील सुरू आहे."

- दत्ता बहिरट माजी नगरसेवक कॉग्रेस

" मी गोखलेनगरचा रहिवासी व पर्यावरण प्रेमी आहे. शिवाजीनगरचे नैसर्गिक वरदान म्हणजे आपली वेताळ टेकडी आहे. हजारो झाडं तोड़ून पर्यावरणाला हानी करून रस्ते होणार आहेत, तसेच नागरिकांची घरे जाणार आहेत. त्यामुळे आमचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. पुढच्या पिढीसाठी तसेच भविष्यासाठी शेकडो नागरिकांना व युवकांना सोबत घेऊन घरोघरी जनजागृती करत आहोत. हजारो नागरिक १५ तारखेला जनजागृती अभियानात सहभागी होतील."

- प्रवीण डोंगरे विभाग प्रमुख शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे)

" शहरास लाभलेल्या नैसर्गिक टेकड्या, जंगलाचा परिसर हा संपत्ती म्हणून जपला जाणे आवश्यक आहे. समृद्ध निसर्ग, मानवासह इतर अस्तित्वाचे महत्व हे गेल्या दोन -तीन दशकांमध्ये अधोरेखित झाले आहे. त्यामुळे वृक्ष संपत्ती, वन जीव, जलचर , पाण्याचे स्त्रोत्र यांना बाधा आणणाऱ्या या रस्त्याला आम आदमी पक्ष विरोध करणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणं गरजेचं आहे. प्रकल्पाबाबत जनतेला, पर्यावरणवाद्यांना विश्वासात घेतले नाही. तसेच या प्रस्तावामागे काही बिल्डर लॉबीचे छुपे हितसंबंध आहेत का? अशी शंकासुद्धा आपला आहे.

- मुकुंद किर्दत, प्रवक्ते, आम आदमी पार्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT