Porsche Crash Case Esakal
पुणे

Porsche Crash Case: कल्याणीनगर अपघात प्रकरणात अपडेट; रक्ताचा नमुना बदलताना CCTV मध्ये कैद झालेले 'ते' दोघे अखेर अटक

अनिल सावळे, सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. ४ : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणात ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलल्याप्रकरणी गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. ४) मुंबईतून दोघांना अटक केली. न्यायालयाने या दोघा आरोपींना येत्या १० जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अश्पाक बाशा इनामदार (वय ३६, रा. धानोरी, विश्रांतवाडी) आणि अमर संतोष गायकवाड (वय २७, रा. सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी पोर्श मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने आयटी अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर मोटारचालक अल्पवयीन आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले होते. त्यावेळी अल्पवयीन आरोपीचे वडील आरोपी विशाल अग्रवाल यांनी ससूनमधील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे यांच्या मदतीने रक्ताचा नमुना बदलला.

या प्रकरणात डॉ. तावरे याच्यासह डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शवागारामधील शिपाई अतुल घटकांबळे या तिघांना अटक केली होती. तसेच, विशाल अग्रवालला या गुन्ह्यात अटक केली होती. दरम्यान, अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हीने मुलाच्या ऐवजी स्वत:च्या रक्ताचा नमुना दिल्याचे तपासात समोर आले होते. या प्रकरणात गुन्हे शाखेने शनिवारी (ता. १) शिवानी अग्रवालला अटक केली होती.

ससून रुग्णालयात शिवानी आणि विशाल अग्रवाल मोटारीतून आले होते. त्यावेळी दुसऱ्या मोटारीत आणखी दोघेजण ससूनमध्ये आल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसून आले होते. डॉ. तावरेला कोणामार्फत पैसे दिले, याचा शोध गुन्हे शाखेकडून घेण्यात येत होता. अग्रवालने अश्पाक आणि अमर यांच्याशी संपर्क साधून डॉ. तावरेला पैसे दिल्याची माहिती तपासात समोर आली

त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने पसार झालेल्या अश्पाक आणि अमर या दोघांना अटक केली. पोलिसांनी या दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पुढील सोमवारपर्यंत (ता. १०) पोलिस कोठडी सुनावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT