Pune Porsche Accident
पुणे अपघाताला नवीन वळण लागलं आहे. विशाल अग्रवाल यांच्या कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आलं आहे. विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे छोटा राजनसोबत संबंध असल्याची माहिती मिळत आहे. आपल्या भावासोबत असलेल्या संपत्तीच्या वादात सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी छोटा राजनची मदत घेतली होती. या वादात शिवसेनेचे अजय भोसले यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्या विरोधात बंड गार्डनर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल आहे.
याप्रकरणी मोक्का लावणे अपेक्षित असताना पुणे पोलिसांनी आयपीसीची कलमे लावली. आरोपपत्र दाखल करेपर्यंत सुरेंद्र अग्रवाल यांना अटक देखील करण्यात आली नव्हती. दरम्यान ज्या अजय भोसली यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्यांनी एबीपी माझा सोबत संवाद साधला आहे.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत अजय भोसले शिवसेनेकडून मैदानात होते. प्रचारादरम्यान त्यांच्या निवडणुकीची रॅली कोरेगाव पार्क मुंडवा परिसरात आली असताना अचानक अजय भोसले यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यांच्या चालकाच्या छातीला गोळी लागली होती. अजय भोसले बचावले. या गोळीबाराचा आरोप सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्यावर झाला होता.त्यांनी अजय भोसले यांची छोटा राजनला सुपारी दिल्याचं स्पष्ट झालं होतं.
अजय भोसले सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आहेत. तर ज्या आरोपीने कल्याणी नगरमध्ये पोर्शे कारने दोन जणांना चिरडले. त्याचे सुरेंद्र कुमार आजोबा आहेत.
सुरेंद्र कुमार यांचे सख्खे भाऊ रामकुमार अग्रवाल यांच्यासोबत संपत्तीचा वाद होते. अजय भोसले त्यावेळी राम कुमार अग्रवाल यांच्यासोबत काम करत होते. त्यावेळी हा गोळीबार घडला.
अजय भोसले म्हणाले, "२००९ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर मी वडगाव शेरी मधून आमदारकीसाठी उभा होतो. त्या अगोदर माझे रामकुमार अग्रवाल यांच्यासोबत मैत्रीचे सबंध होते. त्यावेळी निवडणुकीच्या वर्षभर आधी छोटा राजनचे मला फोन यायचे. दोन भावांची भांडण सुरु होती. हजार-बाराशे कोटी रुपयाचा वाद होता. राम अग्रवाल सुरेंद्रकुमारला पैसे देत नव्हता. त्यावेळी सुरेंद्रकुमारने छोटा राजनला सांगितलं की अजय भोसले माझ्या भावाचा खास मित्र आहे. तो त्याला सपोर्ट करतो. म्हणून त्याने मला माराची धमकी दिली."
भोसले पुढे म्हणाले, निवडणूक प्रचाराची सांगता होती. त्या दिवशी सकाळी १० वाजता माझ्यावर पहिला गोळीबार जर्मन बेकरीजवळ झाला. मात्र त्यावेळी मीसफायर झाली. नंतर आम्ही दोन किलोमिटर त्यांचा पाठलाग केला. तेव्हा वळून त्यांनी दुसरी गोळी मारली ती काचेतून माझ्या मित्राच्या छातीत लागली. त्याला आम्ही रुबी हॉलला आणलं. हा तपास बंड गार्डनर पोलीस स्टेशनकडे आला.
प्रथमदर्शनी हे विरोधकांचे काम आहे अशी चर्चा होती. एक वर्षानंतर गोळीबार करणाऱ्यांना अटक केली. तेव्हा कुणी सुपारी देली हे समोर आलं. ज्यावेळी छोटा राजनला अटक केली. तेव्हा छोटा राजनच्या सर्व केस सीबीआयकडे देण्यात आल्या. ही केस आता सीबीआयकडे आहे. परंतू त्यावेळी सुरेंद्रकुमारला अटक व्हायला पाहिजे होती. मात्र त्याला अटकच करण्यात आली नसल्याचे अजय भोसले म्हणाले.
सुरेंद्रकुमारचे कामच आहे जिथं जाईल तिथं आर्थिक उलाढाल करायची आणि प्रकरणे दाबायची. माझ्यावर गोळीबार प्रकरणात छोटा राजन, गोळीबार करणारा साकेत आरोपी आहे, उत्तर प्रदेशचा संजय यादव, संतोष शेट्टी हे फरार आहेत. एकूण ८ आरोपी आहेत. आता केस सुरु असून आमच्या साक्ष झाल्या आहेत, अशी माहिती अजय भोसले यांनी दिली.
अजय भोसले यांना अटक झाली नाही म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो. सुरेंद्रकुमारने सुपारी दिली त्याला अटक करा म्हणून आम्ही मागणी करत होतो. सुरेंद्रकुमार अग्रवाल छोटा राजनला बँकॉकला छोटा राजनला भेटायला गेला होता. याचे पुरावे देखील आम्ही दिले. तरी देखील त्यांना अटक केली आहे. ते कायदा काणून विकत आहेत. हे संपूर्ण कुटुंब गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. प्रत्येकावर गुन्हे दाखल आहेत, असा धक्कादायक आरोप अजय भोसले यांनी केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.