Pune Porsche Accident Case Pune Municipal Corporation esakal
पुणे

Pune Porsche Accident : कल्याणीनगरमधील दुर्घटनेनंतर पुणे महानगरपालिकेची तीन बड्या हॉटेलसह तब्बल 54 ठिकाणी कारवाई

बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन पोर्शे ही आलिशान कार सुसाट चालवून दोघांचा (Pune Porsche Accident) बळी घेतला.

​ ब्रिजमोहन पाटील

या कारवाईमध्ये १० अभियंता, २१ पोलिस, ४५ एमएसएल, ४० मजूर, जॉ कटर १, जेसीबी ७, ब्रेकर ३, गॅस कटर ३ यांचा समावेश होता.

पुणे : शहरातील रेस्टॉरंट, रुफ टॉप हॉटेल, पबच्या अनधिकृत बांधकामाकडे महापालिकेने (Pune Municipal Corporation) दुर्लक्ष केले. मात्र, कल्याणीनगर येथील घटनेनंतर (Kalyani Nagar Accident) महापालिकेचे डोळे उघडले आहेत. शहरात आज (ता. २२) कारवाईला जोर आला असून, तीन मोठ्या हॉटेलसह ५४ ठिकाणी कारवाई करून ५४ हजार ३०० फूट चौरस फूट बांधकाम पाडून टाकले आहे.

शहरातील मोठ्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन पोर्शे ही आलिशान कार सुसाट चालवून दोघांचा (Pune Porsche Accident) बळी घेतला. त्यामुळे संपूर्ण देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. यानिमित्ताने पबमध्ये होणारी नियमांचे उल्लंघन करून होणारी दारू विक्री, वेळेचे उल्लंघन याकडे पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष वेधले गेले आहेत. त्याच वेळी कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, मुंढवा, खराडी या भागात अनधिकृत बांधकामे, शेड मारून अनेक हॉटेल सुरु केले आहेत.

इमारतीच्या गच्चीवर अनधिकृतपणे रुफ टॉप हॉटेल सुरु आहेत. इमारतीमध्ये अंतर्गत बदल करून पब सुरु केले आहेत. येथे शेकडो ग्राहक रात्री दारू पिण्यासाठी जात असताना त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोणत्या भागात किती अनधिकृत हॉटेल आहेत याची माहिती महापालिकेकडे आहेत. त्यांना यापूर्वी नोटिसा बजावल्या आहेत. पण महापालिकेचा धाक नसल्याने कारवाई करूनही पुन्हा हॉटेल सुरु केले जाते. या मुजोरपणापुढे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारीही हतबल झाले आहेत.

कल्याणीनगर येथील घटनेच्या निमित्ताने महापालिकेने मुंढवा, कोरेगाव पार्क, पुणे स्टेशन, विमाननगर, घोरपडी या भागातील अनधिकृत हॉटेलवर कारवाई सुरु केली आहे. मंगळवारी दोन रुफ टॉप हॉटेलवर कारवाई केली होती. आज ६० ठिकाणी कारवाईचे नियोजन केले होते. त्यापैकी ५४ ठिकाणी सायंकाळपर्यंत कारवाई झाली.

यामध्ये हॉटेल अनवाइड, हॉटेल सुपरक्लब, हॉटेल ओरीला या तीन मोठ्या हॉटेलवर जॉ करटने कारवाई करून त्यांचे बांधकाम जमीनदोस्त केले. तर फ्रंट मार्जिन व साइड मार्जिनमधील ४४ छोटे हॉटेल, ७ रुफ टॉप हॉटेलवर कारवाई केली. यामध्ये ५४ हजार ३०० चौरस फुटाचे बांधकाम पाडून टाकण्यात आले. या कारवाईमध्ये १० अभियंता, २१ पोलिस, ४५ एमएसएल, ४० मजूर, जॉ कटर १, जेसीबी ७, ब्रेकर ३, गॅस कटर ३ यांचा समावेश होता.

‘‘महापालिकेने ८९ अनधिकृत हॉटेलची यादी केली आहेच, पण त्याशिवाय इतर अनधिकृत हॉटेलची माहिती सर्वेक्षणाद्वारे काढली आहे. त्यांच्यावर आजपासून कारवाई सुरु केली आहे. या हॉटेलला यापूर्वी नोटिसा बजावल्या आहेत, पण कारवाईनंतर पुन्हा हॉटेल सुरु होते. त्यांच्यावर वारंवार कारवाई केली जात आहे.’’

-प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT