पुणे

Porsche Accident : 'ससून'च्या चौकशी समितीला बिर्याणीची मेजवाणी; पुण्यातल्या 'या' प्रसिद्ध हॉटेलातून आलं पार्सल

ससून हॉस्पिटलमधील गैरप्रकाराचा तपास करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यात जे.जे. हॉस्पिटलच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे या समितीच्या अध्यक्ष आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या आयुक्तांमार्फत डॉक्टर सापळेंची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये डॉक्टर गजानन चव्हाण आणि डॉक्टर सुधीर चौधरी यांचाही समावेश आहे.

संतोष कानडे

Sassoon Hospital : पुण्यातल्या कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये बदल केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आलेली आहे.

मंगळवारी या प्रकरणाची चौकशी सुरु झाली. काही वेळ चौकशी केल्यानंतर समितीच्या खातीरदारीसाठी पुण्यातल्या प्रसिद्ध हॉटेलमधून बिर्याणी मागवण्यात आलेली होती. समितीमधल्या सदस्याांनी बिर्याणीवर ताव मारला. सदस्यांसाठी स्पेशल बिर्याणीचं पार्सल आणल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

'साम टीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी ससून रुग्णालयात चौकशीसाठी आलेल्या समितीला पुण्यातील प्रसिद्ध 'ब्लू नाईल' हॉटेलमधून बिर्याणी मागवण्यात आलेली होती. त्यामुळे समितीवर टीका होत आहे. समितीने तब्बल सात तास चौकशी केली आहे.

ससून हॉस्पिटलमधील गैरप्रकाराचा तपास करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यात जे.जे. हॉस्पिटलच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे या समितीच्या अध्यक्ष आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या आयुक्तांमार्फत डॉक्टर सापळेंची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये डॉक्टर गजानन चव्हाण आणि डॉक्टर सुधीर चौधरी यांचाही समावेश आहे.

ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरनोर यांच्यावर कल्याणी नगरमधील अपघाताप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी या दोन्ही डॉक्टरांना बेड्या ढोकण्यात आल्या आहेत. शिवाय एका शिपायाला देखील अटक करण्यात आली आहे. ससून रुग्णालयातील हा गैरप्रकार धक्कादायक असल्याने याप्रकरणी तपासासाठी समितीची स्थापना करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT