Pune Porsche Accident |Kalyani Nagar Esakal
पुणे

Pune Porsche Accident: 'पाहिजे तेवढे पैसे घ्या पण, मारू नका...', पोर्श अपघातातील आरोपी काय ओरडत होता? वाचा, प्रत्यक्षदर्शीच्या शब्दांत

Porsche Accident Pune: "पोर्श कारचा वेग खूप होता. कारने मोटरसायकलला इतक्या जोरात धडक दिली की आम्हाला काहीच समजले नाही. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. तिने 15 फूट उंच उडाली आणि माझ्यासमोर पडली."

आशुतोष मसगौंडे

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील पोर्श अपघात प्रकरण देशातील सर्वात चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या सगळ्यात आता घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेले प्रत्यक्षदर्शीही पुढे येऊ लागले आहेत. आतापर्यंत या प्रकरणातील दोन प्रत्यक्षदर्शींनी संपूर्ण घटनाच सांगितली आहे.

अपघात घडला त्यावेळी घटनास्थळापासून 10 फूट अंतरावर असलेल्या अमीन शेख यांनी सांगितले की, दुचाकीला कारने धडक दिल्यानंतर अल्पवयीन मुलाने जोरात ओरडायला सुरू केले. तो म्हणायला लागला की, तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे घ्या पण, मला मारू नका, तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे मी देईन. याबाबतचे वृत्त आजतकने दिले आहे.

अपघातस्थळावरील सीसीटीव्हीमध्ये हा घटनाक्रम सांगणारा प्रत्यक्षदर्शी अमीन शेखही दिसत आहे. फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, त्याने रस्ता ओलांडला आणि काही सेकंदात एक पोर्श कार त्याच्या मागून गेली आणि दुचाकीला धडकली. यानंतर दुचाकीस्वार तरुण व तरुणीचा कारच्या धडकेत मृत्यू झाला. यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या जमावाने कार चालवणाऱ्या मुलाला बेदम मारहाण केली.

"पोर्श एक अल्पवयीन आरोपीच चालवत होता"

दरम्यान या प्रकरणातील आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले होते की, हा अपघात घडला तेव्हा अल्पवयीन आरोपी कार चालवत होता. त्यांनी सांगितले की घटनेच्या दिवशी पोर्श कारचा वेग खूप होता. कारने मोटरसायकलला इतक्या जोरात धडक दिली की आम्हाला काहीच समजले नाही. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. तिने 15 फूट उंच उडाली आणि माझ्यासमोर पडली.

दरम्यान अपघातानंतर गाडीच्या सर्व एअरबॅग उघडल्यामुळे आरोपींना पळून जाता आले नाही, असे प्रत्यक्षदर्शी संकेत यांनी सांगितले. कारमध्ये अल्पवयीन आरोपींशिवाय आणखी दोन ते तीन जण होते. एअरबॅग उघडल्यामुळे हे सर्व लोक कारमधून बाहेर आले, त्यानंतर जमावाने आरोपीला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली.

प्रकरण दडपण्यासाठी ससूनच्या डॉक्टरांचा सहभाग

ससून जनरल हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख अजय तावरे, याला पुणे पोर्शे क्रॅश प्रकरणातील 17 वर्षीय आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. तसेच यामध्ये सहभागी असलेल्या डॉ. श्रीहरी हलनूर यालाही अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Chh. Sambhajihnagar Election Reslut : घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार, याची उत्सुकता

SCROLL FOR NEXT