Pune Porsche Accident esakal
पुणे

कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुण्यात तब्बल 144 रेस्टॉरंटवर बुलडोझर; अनधिकृत बांधकाम केल्याने 21 जणांवर गुन्हे दाखल

​ ब्रिजमोहन पाटील

बाणेर, बालेवाडी, कोथरूड, खराडी, वडगाव शेरी, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, कोरेगाव पार्क, हडपसर, बिबवेवाडी, महंमदवाडी, सिंहगड रस्ता आदी भागात रुफ टॉप हॉटेलचे मोठे पेव फुटले आहे.

पुणे : कल्याणीनगर येथील अपघातानंतर (Pune Porsche Accident) रेस्टॉरंट, पबसाठी केलेल्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्‍नही ऐरणीवर आल्याने महापालिकेने गेल्या महिन्याभरात ८५ रुफटॉप आणि ५५ तळमजल्यावरील रेस्टॉरंट, पबवर कारवाई करून ३ लाख ६० हजार चौरस फुटाचे बांधकाम पाडून टाकले आहे. तर, अनधिकृत बांधकाम केल्याने २१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, असा दावा महापालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाने केला आहे.

शहरातील इमारतींच्या गच्चीवर रुफटॉप हॉटेल सुरु करण्याचा प्रकार सर्रास सुरु झाला आहे. बाणेर, बालेवाडी, कोथरूड, खराडी, वडगाव शेरी, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, कोरेगाव पार्क, हडपसर, बिबवेवाडी, महंमदवाडी, सिंहगड रस्ता आदी भागात रुफ टॉप हॉटेलचे मोठे पेव फुटले आहे. अनधिकृत बांधकाम असूनही तेथे राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे दारू विक्रीचा परवाना देण्यात येत आहे.

मंजूर टेबल, खुर्च्यांपेक्षा व निश्‍चित केलेल्या ठिकाणाशिवाय हॉटेलच्या आवारात इतरत्र दारू विक्री केली जात आहे. या हॉटेलमुळे निवासी भागात रात्री उशिरापर्यंत गोंधळ व वाहतूक कोंडी होत आहे. त्याबाबत अनेक तक्रारी येऊन देखील महापालिका, पोलिसांकडून कारवाई केली जात नव्हती. कल्याणीनगर येथे मद्यधुंद अल्पवयीन मुलाने महागडी पोर्शे गाडी चालवून दोघांचा बळी घेतला, याप्रकरणानंतर शहरातील रुफ टॉप हॉटेल, रेस्टॉरंटवर कारवाई सुरु झाली.

बांधकाम विभागाने पुणे पोलिसांना ८९ अनधिकृत रुफटॉपची माहिती दिली होती. पोलिसांनी त्यावर कारवाई केली नाही, अखेर महापालिकेनेच कारवाई सुरु करून त्यापैकी ८५ ठिकाणी कारवाई पूर्ण केली आहे. तर तळ मजल्यावर सुरु असलेल्या ५९ हॉटेलवरही बुलडोझर चढवून अनधिकृत बांधकाम, शेड पाडून टाकले आहे. वारंवार अनधिकृत बांधकाम करून हॉटेल सुरु करणाऱ्या हॉटेल मालकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिकेने अनेक तक्रारी दिल्या आहेत. त्यापैकी केवळ २१ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

‘‘ १४४ अनधिकृत रुफटॉप हॉटेल, रेस्टॉरंटवर महापालिकेने कारवाई करून ३.६० लाख चौरस फुटाचे बांधकाम पाडून टाकले आहे. ज्या ठिकाणी परवानगी शिवाय अंतर्गत बदल केले आहेत, तेथे महापालिका नोटीस देऊन कधीही कारवाई करू शकते. जर अंतर्गत बदल करायचे असतील तर आधी परवानगी घेणे गरजेचे आहे. आधी बदल करून नंतर प्रस्ताव टाकणे योग्य नाही, अशा ठिकाणी कारवाई करू.’’

-डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Grand Finale LIVE Updates - टीआरपी क्वीन निक्की तांबोळी घराबाहेर; निक्कीचा बीबीमराठी ५चा घरातला प्रवास संपला

Viral: 'मला तुरुंगात पाठवा, माझ्याकडे...', व्यापारी GST कार्यालयात गेला, अधिकाऱ्यांसमोरच अर्धनग्न होत छेडलं आंदोलन, कारण काय?

Sports Bulletin 6th October 2024: भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर विजय ते रोहित शर्माला पत्नीसमोर तरुणीनं केलेलं प्रपोज

Bopdev Ghat Rape Case : बोपदेव घाट आत्याचार प्रकरणातील नराधम अद्यापही फरार; पोलिसांकडून २०० संशयितांची कसून चौकशी

Nashik Fraud Crime : वर्क फ्रॉम होम, शेअर मार्केट ट्रेडिंगचे आमिष भोवले; सायबर भामट्याने घातला 37 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT