Pune Porsche Accident Esakal
पुणे

Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाने दारू प्यायलेला पब करण्यात आला सील; मालकासह मॅनेजरला ४ दिवसांची कोठडी

Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघात प्रकरणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने या अपघात प्रकरणात कारवाई केली आहे.

सनील गाडेकर @sanilgadekar

पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघात प्रकरणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने या अपघात प्रकरणात कारवाई केली आहे. अपघातातील अल्पवयीन आरोपीने ज्या पबमधून मद्य घेतलं होतं त्या पबवरती कारवाई करण्यात आली आहे. कोझी आणि ब्लॅक हे दोन्ही पब राज्य उत्पादन विभागाने सील केले आहेत. राज्य उत्पादक शुल्क विभागाने पबमध्ये जाऊन कारवाई केली आहे. नियमबाह्य पध्दतीने मद्य विक्री केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने पब सील करत मोठी कारवाई केली आहे.

अल्पवयीन आरोपी तरुणाने त्या रात्री पार्टीसाठी किती पैसे खर्च केले?

पुण्यातील अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपी तरुणाने त्या दिवशी पार्टीसाठी किती रुपये खर्च केले होते याचा आकडा समोर आला आहे. अल्पवयीन आरोपी तरुणाने त्यादिवशी ड्रिंक आणि जेवणासाठी तब्बल ४८ हजार रुपये खर्च केले आहेत. 'फ्री प्रेस जनरल'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पुणे पोलीस कमीशनर अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील माहिती दिल्याचं कळतंय. एफआयआरमधील माहितीनुसार, अल्पवयीन आरोपी कोझी रेस्टॉरंटमध्ये त्याच्या मित्रांसोबत रात्री साडेनऊच्या सुमारास गेला होता. त्यानंतर त्याने आणि मित्रांनी मद्य प्राशन केले. त्यानंतर ते हॉटेल ब्लॅकमध्ये गेले.

कोझी व ब्लॅक हॉटेलच्या मालकासह व्यवस्थापकाला चार दिवसांची पोलिस कोठडी

कोझी हॉटेलचे मालक, व्यवस्थापक आणि हॉटेल ‘ब्लॅक’चे मालक यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी हा आदेश दिला. 'कोझी’ हॉटेलचे मालक नमन प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन अशोक काटकर, हॉटेल ‘ब्लॅक’चे मालक संदीप रमेश सांगळे असे कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये मद्य पुरविल्याप्रकरणी दोन्ही हॉटेलमालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

१९ मेच्या पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर-एअरपोर्ट रस्त्यावरील लॅंडमार्क सोसायटीजवळ भरधाव ग्रे रंगाच्या आलिशान पोर्श गाडीने दुचाकीला धडक दिली. त्यात अनिष अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा या आयटी अभियंत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी अल्पवयीन मुलाविरुद्ध (वय १७ वर्षे आठ महिने) गुन्हा दाखल केला आहे. त्याला रविवारी न्यायालयाने जामीन दिला. दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यात अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विद्या विभुते आणि योगेश कदम यांनी केली. आरोपींच्या वतीने ऍड. एस. के. जैन यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

आजचे राशिभविष्य - 15 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT