pune porsche accident update esakal
पुणे

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

pune porsche accident : पुणे शहरात 18 मे च्या मध्यरात्री एका 17 वर्षीय मुलाने 3 कोटी रुपयांची पोर्श कार भरधाव वेगाने चालवत असताना दुचाकीला धडक दिली.

Sandip Kapde

pune porsche accident :

पुण्यातील कल्याणीनगरमधील अपघात देसभर चर्चेचा विषय बनला आहे. एका अल्पवयीन आरोपीने भरधाव वेगात असणाऱ्या पोर्शे कारने दोन अभियंत्यांना चिरडले. यात दोघांचा मृत्यू झाला. दारूच्या नशेत 17 वर्षीय अल्पवयीन कार चालवत होता. या प्रकरणात सातत्याने नवनवीन पैलू समोर येत आहेत. दरम्यान पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बारावीत 60 टक्के गुण मिळाले म्हणून अल्पवयीन आरोपीने कल्याणी नगरमधील एका बारमध्ये मित्रांसोबत पार्टी केली. यावेळी त्याने दिड तासात ४८ हजार हजार रुपये खर्च केले. 15 ते वीस मित्रांसोबत त्याने पार्टी केली. त्यानंतर अपघात झाला.

सुरेंद्र अग्रवालवर आरोप

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र अग्रवालने ड्रायव्हर गंगारामला धमकी दिली होती. अपघातावेळी ड्रायव्हर कार चालवत असल्याचे भासवणे त्याला महागात पडले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास सुरेंद्र अग्रवाल याला त्याच्या घरातून अटक केली.

चालकाच्या तक्रारीवरून कारवाई

चालक गंगारामच्या तक्रारीवरून पुणे गुन्हे शाखेने सुरेंद्र अग्रवालला अटक केली आहे. सुरेंद्र अग्रवाल आणि त्यांच्या साथीदारांनी आपलं अपहरण केल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि पोर्शे कार चालवल्याचा ठपका घेण्याची धमकी दिली. चालकाच्या तक्रारीवरून, येरवडा पोलिसांनी किशोरच्या आजोबा आणि वडिलांविरुद्ध आयपीसी कलम 365 (व्यक्तीला ओलीस ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण) आणि 368 (चुकीच्या पद्धतीने बंदिस्त ठेवणे) गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण

पुणे शहरात 18 मे च्या मध्यरात्री एका 17 वर्षीय मुलाने 3 कोटी रुपयांची पोर्श कार भरधाव वेगाने चालवत असताना दुचाकीला धडक दिली. वाहनाची धडक एवढी जोरदार होती की दुचाकीचा तोल सुटला आणि दुचाकी लांबपर्यंत रस्त्यावर घासत गेली, त्यामुळे दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली. 

या घटनेच्या 14 तासांनंतर अल्पवयीन आरोपीला कोर्टातून काही अटींसह जामीन मिळाला होता. न्यायालयाने त्याला 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याचे आणि रस्ते अपघातांचे परिणाम आणि उपाय यावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्याचे निर्देश दिले होते. नंतर वाद वाढत गेल्याने न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला. मात्र, आरोपी दारूच्या नशेत असून सुसाट वेगाने कार चालवत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

आता पुण्यातील विशेष न्यायालयाने कार अपघात प्रकरणातील सहा आरोपींना 7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोठडीत पाठवण्यात आलेल्या आरोपींमध्ये अल्पवयीन आरोपीच्या वडिलांचाही समावेश आहे. तर अल्पवयीन आरोपीला 14 दिवस बाल सुधार गृहात पाठवण्यात आले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT