Pune Porsche Accident esakal
पुणे

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणात आज सर्वात मोठी घडामोड! बाप-लेकाला कोर्टात हजर करणार, नव्याने गुन्हा दाखल

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणात आज सर्वात मोठी घडामोड होणार आहे. आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केल्या जाणार आहे.

Sandip Kapde

Pune Porsche Accident:

कार अपघात प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक केली आहे. रविवारी मध्यरात्री एका अल्पवयीन मुलाने पोर्श कारने दोघांना धडक दिली होती, परिणामी दोघांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर अवघ्या 5 तासांत आरोपी अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणाने सोशल मीडियावर जोर धरल्यानंतर आता पोलीसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या बांधकाम व्यावसायिक वडिलांनाही आरोपी बनवून अटक केली आहे. पुणे कार अपघात प्रकरणावर, पुणे सीपी अमितेश कुमार म्हणाले, 'एफआयआरमध्ये 5 आरोपी होते, त्यापैकी 3 आरोपींना आम्ही रात्री उशिरा अटक केली. त्यांना आम्ही न्यायालयात हजर करू.

बाल हक्क न्यायालयाने हिट ॲंड रन प्रकरणातला आरोपीला सज्ञान म्हणून खटला चालवायची परवानगी दिल्यास पुणे पोलिस तातडीने त्याला अटक करणार आहेत. पुणे पोलिसांनी वकिलांमार्फत आरोपीला नोटीस पाठवली आहे. न्यायालयात हजर न राहिल्यास फरार घोषित करण्याची कारवाई करणार असल्याचा नोटिशीत उल्लेख आहे.

त्यामुळे पुणे अपघात प्रकरणात आज सर्वात मोठी घडामोड घडणार आहे. आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केल्या जाणार आहे. तसेच आरोपीचा फॉरेन्सीक रिपोर्ट देखील येणार आहे. आल्पवयीन आरोपीवर दाखल केलेल्या गुन्ह्यात कलमं देखील वाढवली. (Pune Porsche Accident Update)

आरोपीवर मोटार वाहन कायद्यातील १८५ च्या अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. तर विशाल आग्रवाल याला दुपारी २ वाजता कोर्टात करण्यात येणार आहे. ससून रुग्णालयात त्यांची काल तपासणी करण्यात आली आहे.

तर विशाल अग्रवाल यांच आरोपी मुलगा याला बाल न्याय मंडळासमोर नेण्यात येणार आहे. अल्पवयीन प्रकरणात मोडतं म्हणून आरोपीला जामीन मिळाला असं म्हटल्या जात होतं. मात्र पुणे पोलिसांनी नव्याने अर्ज केला आहे. या प्रौढ गटामध्ये गणल्या जावं. दरम्यान आज यावर सुनावणी होणार आहे.

कोर्टाच्या निर्णयावर सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना काय आदेश मिळतील, हे पाहणे महत्वाचे आहे.  

१८५ कलमानुसार दारु पिवून गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्यासाठी दोन दिवस लावले. ज्या दिवशी अपघात झाल्या त्याच दिवशी गा गुन्हा दाखल करायला हवा होता असं नागरिकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT