पुणेः पुण्यातल्या 'हिट अँड रन' प्रकरणात दिवसेंदिवस नवनवे खुलासे होत आहे. या प्रकरणाच्या तापासाचे सगळे धागेदोरे ससून रुग्णालयात सापडत असल्याने सर्वांच्याच नजरा तिकडे आहेत. याच प्रकरणात दोन डॉक्टर आणि एका सफाई कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.
बुधावरी राज्य शासनाने ससून रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तपासामध्ये रोज नवनव्या लोकांच्या चौकशा होताना दिसून येत आहेत. अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदलल्यामुळे सगळा गदारोळ उडाला आहे.
याच प्रकरणात अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरु आहे, अशा बातम्या काही माध्यमांनी दिल्या होत्या. परंतु तशी त्यांची चौकशी झालेली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.
याशिवाय, अल्पवयीन आरोपीचं म्हणून जे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आलेलं होतं, ते आरोपीच्या आईचं होतं, अशाही बातम्या येत आहेत. परंतु याही बातम्यांमध्ये तथ्य नसल्यांच पोलिसांचं म्हणणं आहे.
'त्या' बातम्यांमध्ये तथ्य नाही- अतिरिक्त पोलिस आयुक्त
शिवानी अग्रवाल यांना चौकशीसाठी बोलावले नाही किंवा ताब्यात घेतलेले नाही. तसेच ब्लड सॅम्पल शिवानी अग्रवाल यांचे होते, या सर्व बातम्यांम्ये तथ्य नाही. अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी 'सकाळ'ला दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.