Pune Porsche Crash  Sakal
पुणे

Pune Porsche Accident : भ्रष्ट साखळीचा फास

सकाळ वृत्तसेवा

कल्याणीनगर अपघात

१९ मे रोजी पहाटे अडीच वाजता भरधाव मोटारीच्या धडकेत दोन आयटी अभियंत्यांचा मृत्यू

पोलिस, डॉक्टर, राजकारणी, प्रशासन या सर्वांची भ्रष्ट साखळी सामान्यांना न्याय देत नसल्याचे इरसाल नमुने आपण आजपर्यंत चित्रपटांत पाहिले होते. मात्र पुण्यात बड्या बिल्डरच्या ‘अल्प’वयीन मुलाच्या भरधाव मोटारीने दोन बळी घेतले आणि पुढील घटनाक्रम अगदी चित्रपटालाही लाजवेल असाच घडला.

‘आम्ही त्या बळींना न्याय मिळू देणारच नाही,’ असा चंगच जणू व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी बांधला. पोलिस, राज्य उत्पादन शुल्क, महापालिका, सरकारी डॉक्टर या सर्वांनी संशयित आरोपीला मदत करण्यासाठी शक्य तेवढी कृत्ये एका रात्रीत करून दाखवली.

राजकारण्यांनी ते ‘डर्टी’च असतात हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले. अपघातानंतर दहा दिवसांत पुणेकरांना वेढलेल्या भ्रष्ट साखळीचे विदारक दर्शन घडले. या भ्रष्ट साखळीवर वेळीच हातोडा न घातल्यास व्यवस्थेचा किळसवाणा नंगानाच अजून फोफावेल.

पोलिसांची कुचराई

  • पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक निरीक्षक विश्‍वनाथ तोडकरी यांनी पोलिस नियंत्रण कक्षात आणि वरिष्ठांना अपघाताची माहिती दिली नाही.

  • पोलिसांकडून सकाळी सव्वाआठला अल्पवयीन आरोपीविरुद्ध कलम ३०४-अ अन्वये गुन्हा दाखल

  • न्यायालयात हजर करण्यापूर्वी आरोपीविरुद्ध कलम ३०४ दाखल.

  • अल्पवयीन आरोपीची तब्बल नऊ तासांनी ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी

  • जगदाळे, तोडकरी यांच्यावर निलंबनाची कारवाई

‘न्याया’च्या बाजू

  • बाल न्याय मंडळाकडून निबंध लिहिण्याच्या आणि वाहतूक नियमन करण्याच्या अटींवर अल्पवयीन आरोपीला जामीन

  • हा निर्णय धक्कादायक असल्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

महापालिकेला उशिरा जाग

  • चौफेर टीकेनंतर महापालिकेकडून अवैध रूफटॉपवर कारवाईला सुरुवात

  • बार, हॉटेलांमधील अवैध बांधकामे शोधण्यास प्रारंभ

  • ८९ रूफटॉपवर कारवाई करण्यास महापालिकेचे पोलिसांना साकडे

‘ससून’ची पोलखोल

  • ससूनमधील वैद्यकीय अधिकाऱ्याने अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने कचरापेटीत फेकून दिले. दुसऱ्याच व्यक्तीचे रक्ताचे नमुने घेऊन त्यावर अल्पवयीन मुलाचे नाव लिहिले.

  • डीएनए चाचणीत रक्ताचे नमुने बदलल्याचा अहवाल.

  • ससूनमधील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शवागारातील कर्मचारी अतुल घटकांबळे या तिघांना २६ मे रोजी रात्री अटक

राज्य उत्पादन शुल्कला धुंदी

  • शहरात अजूनही अवैध मद्यविक्री सुरूच

  • नागरिकांकडून संताप व्यक्त झाल्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाला कारवाईसाठी जाग

  • आठ दिवसांत ५० हून अधिक रूफटॉप, बारवर कारवाई

राजकीय साटेलोटे

  • अटकेत असलेल्या डॉ. अजय तावरे यांना ससूनच्या अधीक्षकपदावर नियुक्तीसाठी आमदार सुनील टिंगरे यांची मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे शिफारस

  • गेल्या वर्षीपर्यंत संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या मुश्रीफ यांच्याकडूनही तत्काळ या शिफारशीला मान्यता

  • याच डॉ. तावरेने अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलले

  • आमदार टिंगरे अपघाताच्या रात्री पोलिस ठाण्यात

‘आरटीओ’कडूनच नियमांचा भंग

  • विनानंबर प्लेट रस्त्यावर धावणारी मोटार दिसलीच नाही

  • अपघातग्रस्त मोटारीचा अहवाल आठ दिवसांनंतर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDWvsSLW : भारताची ‘नारी शक्ती’! श्रीलंकेला पराभूत केले; पाकिस्तान, न्यूझीलंडला धक्के बसले, Semi चे गणित मजेशीर झाले

IND vs BAN: भारताकडून दिल्लीतही बांगलादेश चीतपट! कर्णधार सूर्यकुमारच्या टीमने मालिकाही घातली खिशात

‘MPSC’कडून संयुक्त पूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर! 5 जानेवारी व 2 फेब्रुवारीला ‘या’ परीक्षा; 1813 पदांची होणार भरती

Record तोड खेळी! नितीश रेड्डी-रिंकू सिंगची जमली जोडी; लोकेश राहुल-MS Dhoni चा मोडला विक्रम

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT