Dr. Ajay taware Esakal
पुणे

Pune Porsche Car Accident: पोर्श अपघात प्रकरणी ससूनचा डॉक्टर तावरेच्या घरी पोलिसांंची धाड

Dr. Ajay Taware Sassoon Hospital: अपघाताच्या वेळी अल्पवयीन आरोपी दारूच्या नशेत होता हे सिद्ध होऊ नये म्हणून डॉक्टरांनी लाचेच्या लालसेपोटी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप आहे.

आशुतोष मसगौंडे

पुण्यातील पोर्श अपघात प्रकरण रोज नवी नवी वळणे घेत आहे. पोलिस, वाहनचालक, नेते, साक्षीदार यांच्यानंतर आता सरकारी रुग्णालयातील डॉक्टरही हे प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नांना हातभार लावत असल्याचे समोर आले आहे.

अपघाताच्या वेळी अल्पवयीन आरोपी दारूच्या नशेत होता हे सिद्ध होऊ नये म्हणून डॉक्टरांनी लाचेच्या लालसेपोटी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पुणे पोलिसांनी  ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणाची कसून चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांनी डॉ. अजय तावरेच्या घरी धाड टाकली आहे. अटकेत असलेल्या अजय तावरेला घेऊन पुणे पोलीस त्याच्या घरी गेले होते. तेव्हा पोलिसांनी तेथे कसून चौकशी केली.

तावरेला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर चौकशीत पोलिसांना काही शंका आल्याने त्यांनी तावरेला घेऊन गीता सोसायटीमधील त्याचे घर गाठले. पोलिसांनी तावरच्या घराची झडती घेतली. त्याचबरोबर पोलिसांनी काही तावरेच्या घरून काही सामानही चौकशीसाठी ताब्यात घेतले.

दुचाकीवरून जाणाऱ्या इंजिनीअर तरुण-तरुणीला उडवल्याचा आरोप असलेल्या अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याच्या रक्ताचे नमुने बदलले होते.

पोलीस तपासात हे समोर आले आहे. लाचेच्या लालसेपोटी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी मुलाचे गोळा केलेले रक्ताचे नमुने केवळ डस्टबीनमध्येच फेकले नाही, तर त्या मुलाच्या रक्ताचा नमुना म्हणून दुसऱ्याच्या रक्ताचा नमुना वापरून मद्य तपासणीचा अहवालही तयार केला, जो नकारात्मक आला.

मात्र पुणे पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश केला. आणि ससून जनरल हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावडे आणि सीएमओ डॉ. श्रीहरी हलनोर यांना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT