porsche motors pune accident esakal
पुणे

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणात मोठी कारवाई! ससूनमधील ३ जण निलंबित, ब्लड सॅम्पल बदलण्याचं प्रकरण भोवलं

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनमधील ३ जणांचे निलंबन करण्यात आले आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनमधील ३ जणांचे निलंबन करण्यात आले आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणी अटकेत असलेल्या ससूनच्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील दोन डॉक्टर आहेत तर एक सफाई कर्मचारी आहे. यापैकी डॉ. अजय तावरे यांच्याकडे असलेला कार्यभार काढून घेण्यात आला आहे.

तर कल्याणीनगर अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलले होते. त्याप्रकरणानंतर त्यांच्यावर निंलबनाची कारवाई करण्यात आली आहे. ससूनमधील अजय तावरे, श्रीहरी हरनोळ, अतुल घटकांबळे या तिघांचंही निलंबन करण्यात आलं आहे. आज(बुधवारी) सायंकाळी या तिघांच्या निलंबनाचे पत्रक निघणार असल्याची माहिती आहे.

याबाबत माहिती देताना ससून रूग्णालायाचे डीन विनायक काळे यांनी सांगितले की, डॉ. अजय तावरे यांच्याकडील विभागप्रमुख पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे, त्यांच्याजागी आता डॉ. विजय जाधव यांच्यातडे तो सुपुर्द करण्यात आला आहे.

ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिसांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठविला आहे. तसेच, तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कलमात वाढ केल्याने त्यांची ‘एसीबी’कडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर या दोघांचे निलंबन करण्याबाबत पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच, पोलिसांनी डॉ. तावरे, डॉ. हाळनोर आणि कर्मचारी अतुल घटकांबळे या तिघांविरुद्ध दाखल गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कलमवाढ केली आहे.

या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे. तसेच, निलंबनाच्या प्रस्तावाबाबत वैद्यकीय विभागाकडून लवकरच निर्णय होणे अपेक्षित आहे.

दरम्यान, पोलिस आयुक्तांनी अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्यांच्या प्रलंबित तपासाचा नुकताच आढावा घेतला होता. त्यात अकस्मात मृत्यूचे एक हजार ४०० गुन्हे प्रलंबित असल्याचे समोर आले होते. शवविच्छेदन अहवाल देण्यासाठी डॉ. तावरे हा पोलिस कर्मचाऱ्यांकडे पैशांची मागणी करीत असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT