Pune Porsche accident Esakal
पुणे

Pune Porsche Case: पोर्शे अपघात प्रकरणात पुणे पोलीस जाणार सुप्रीम कोर्टात, जाणून घ्या का उचलले इतके मोठे पाऊल?

आशुतोष मसगौंडे

पुण्यातील कल्याणी नगर येथे 19 मे रोजी एका अल्पवयीन मुलाने मद्यपान करत भरधाव पोर्शे कारने दोघांना उडवले होते. यामध्ये एक तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता.

यामध्ये अनेक नाट्यमय घटना आणि घडामोडी घडल्यानंतर अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात पाठवले होते. त्यानंतर आरोपीच्या नातेवाईकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले होते.

मात्र, या प्रकरणी आता पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द व्हावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पोलिसांना राज्य सरकारने परवानगी दिल्याचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे.

गेल्या आठवड्यात म्हणजेत 25 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीच्या आत्याने दाखल केलेली जामीन याचिका स्वीकारत त्याला बाल सुधारगृहातून सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता या आदेशाला आव्हान देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने पुणे पोलिसांना अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द व्हावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची परवाणगी दिली.

यापूर्वी,ज्युवेनाइल जस्टिस बोर्डाने अल्पवयीन मुलाला अटक केल्यानंतर काही तासांत जामीन मंजूर केला होता. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्यावर खटला चालवण्याची पोलिसांची विनंतीही फेटाळली होती. दरम्यान, हा निर्णयही वादाचे कारण ठरला.

खरं तर, ज्युवेनाइल जस्टिस बोर्डाने आरोपीला अपघातांवर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास, वाहतूक जागरूकता फलक रंगविण्यासाठी, ट्रॅफिक कॉन्स्टेबलसोबत काम करण्यास आणि आरोपीच्या जामीन अटींपैकी समुपदेशन घेण्यास सांगितले होते. यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT