Pune Porsche Car Accident Latest Update  
पुणे

Pune Porsche Crash Case : तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावणाऱ्या 'त्या' दोन अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई!

रोहित कणसे

काही दिवसांपूर्वी घडलेल्या पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. राज्य सरकारने पुण्यातील बाल न्याय मंडळातील दोन अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे.

भरधाव वेगाने गाडी चालवून दोन जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीस ३०० शब्दांचा निबंध लिही आणि पोलिसांसोबत काही दिवस काम कर अशा माफक अटींवर अल्पवयीन आरोपीला जामीन देण्यात आला होता. या प्रकारानंतर सर्व स्तरातून या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली होती. दरम्यान आता या सुनावणीदरम्यान आपल्या पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी दोघांवर कारवाई करत त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

बडतर्फ करण्यात आलेल्या दोन अधिकाऱ्यांची पोर्श कार अपघात प्रकरणातीस आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगून त्याला जामीन मंजूर केल्या प्रकरणी चौकशी करण्यात आली होती. या दोन अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी ५ अधिकाऱ्यांची समिती देखील नेमण्यात आली होती.

दरम्यान या चौकशीनंतर जुलैमध्ये १५० पानांचा अहवाल सादर करण्यात आला होता आणि त्यातच त्या दोन अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा प्रकार समोर आला होता. यांनतर विभागाने त्यांच्याविरोधात कारवाई करत त्यांना बडतर्फ केले आहे. कविता थोरात आणि एल एन धनावडे असं या बडतर्फ करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणात दारुच्या नशेत पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलीसांनी अटक केली होती. यानंतर त्याला बाल हक्क न्याय मंडळासमोर हजर केले होते. यानंतर कविता थोरात आणि एल एन धनावडे या अधिकाऱ्यांनी त्याला ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगून त्याला जामीन मंजूर केला होता. य़ा अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असताना आरोपीला इतक्या लवकर जामीन मिळाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata : भावुक क्षण! रतन टाटांच्या लाडक्या 'गोवा' ने घेतले अंत्यदर्शन; काय आहे हृदयस्पर्शी कहाणी?

Ratan Tata: इस्रायलपासून ते अमेरिकेपर्यंत... टाटा समूहाचे साम्राज्य विदेशात किती पसरले आहे?

Latest Maharashtra News Updates : रतन टाटांच्या पार्थिवाला पोलिसांकडून मानवंदना

Mokhada News : अर्ध्या तासाच्या वादळी पावसाने मोखाड्यात ऊडवली दाणादाण; सुदैवाने जिवीतहानी टळली..

शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा यांना जुहूमधील घर खाली करण्याची नोटीस; पुण्यातील फार्म हाऊसदेखील केलं सील

SCROLL FOR NEXT