Pune Porsche Crash Esakal
पुणे

Pune Porsche Crash: ससून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे ते दोघे कोण? रक्ताच्या नमुन्याच्या अदलाबदली वरून संशय वाढला

Pune Porsche Crash: मुलाच्या आई-वडिलांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणातील तपास पोलीस करत आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण अपघाताचा तपास करणाऱ्या पुणे शहर पोलिसांनी रविवारी न्यायालयात सांगितले की, ससून हॉस्पिटलमधून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने गोळा केले आणि त्याच्या आईच्या रक्ताचे नमुने घेतले तेव्हापासूनची सर्व माहिती उघड झाली आहे. त्याचबरोबर आणखी काही संशयित त्याठिकाणी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीचे पालक यांच्यासह ससूनच्या तीन कर्मचाऱ्यांना आधीच अटक करण्यात आली आहे.

अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना आणि आईला आरोपीचे मूळ रक्ताचे नमुने आरोपी डॉक्टरांपैकी एका डॉक्टरने दिले होते का आणि त्यांनीच ते नष्ट केले होते का, याचा तपास करत असल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. आई आणि वडिलांना न्यायालयाने ५ जूनपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ससून रुग्णालयात १९ मे रोजी घेतलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्याची सरकारी रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एक कर्मचारी यांच्या संगनमताने अदलाबदल केल्याच्या आरोपावरून पुणे शहर पोलिसांनी शनिवारी ४९ वर्षीय आईला अटक केली आणि ५० वर्षीय वडिलांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

अल्पवयीन आरोपीच्या रक्तात अल्कोहोल होते की नाही ते तपासण्यासाठी गोळा केलेल्या 17 वर्षांच्या मुलाच्या नमुन्याशी अदलाबदल करण्यासाठी आईने रक्त दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. आई आणि वडिलांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे पोलिसांनी त्यांच्या संयुक्त चौकशीसह पुढील तपासासाठी कोठडी मागितली.

पोलिसांनी यापूर्वी ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे, त्यावेळी अपघाती वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ. श्रीहरी हरनोळ आणि शवागृहातील कर्मचारी अतुल घाटकांबळे यांना ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर या तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.

पोलिसांची न्यायालयात माहिती

अपघातातील अल्पवयीन आरोपी हा रक्त देण्यासाठी रूग्णालयात आला तेव्हा तो आलिशान कारमध्ये आला, तेव्हा त्यातून तीन व्यक्ती तिथे पोहोचले होते. रक्तनमुना घेईपर्यंत त्या व्यक्ती तेथे उपस्थित होत्या. त्या व्यक्ती कोण याबाबतही पोलिसांकडून तपास केला जात असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते.

सीसीटीव्ही' चित्रीकरणात दिसताहेत संशयित

विशाल व शिवानी अगरवाल यांच्या रक्ताचा नमुना घेऊन 'डीएनए' तपासणीसाठी पाठवायचा आहे. तसेच रक्ताचा नमुना घेतलेल्या दिवशी रुग्णालयातील 'सीसीटीव्ही' मध्ये काही संशयित दिसत असून, आणखी काही आरोपींचा सहभाग निष्पन्न होण्याची शक्यता आहे,' असे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले आहे.

कल्याणीनगर येथे १८ मे रोजी मध्यरात्री आलिशान कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाला कार दिल्याप्रकरणी वडिलांवर आणि पबमध्ये दारू दिल्याने पदच्या चालक-मालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: चंद्रचूड साहेब न्याय देण्याऐवजी टिप्पणीकार झाले होते; उद्धव ठाकरेंनी माजी सरन्यायाधीशांवर व्यक्त केली नाराजी

"आम्ही धनगर समाजाचा मुख्यमंत्री करून न्याय दिला, मात्र महाराष्ट्रात धनगरांना साधं आरक्षण दिलं जात नाही"

मोठी बातमी: रोहित शर्मा पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियात होतोय दाखल, सोबत भारी गोलंदाजही टीम इंडियाच्या मदतीला येतोय

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Latest Maharashtra News Updates live : बाळासाहेब ठाकरे पुतळ्याला शिवसेना (उबाठा) पक्षाचे अभिवादन

SCROLL FOR NEXT