वेल्हे : वेल्ह्यामधील गुंजवणी धरणाच्या पश्चिम अतिदुर्गम भागातील धिसर धनगर वस्तीतला, कानंद नदीवरचा लाकडी पादचारी पूल कुजल्यानं धोकादायक बनला असून जीव मुठीत धरून नागरिक आणि विदयार्थ्यांना ये - जा करावी लागतं असून पूल कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने याठिकाणी तात्काळ नवीन मजबूत लोखंडी पूल करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनकडून करण्यात येत आहे.
धरण क्षेत्रातील कानंदी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीचे पात्र ओलांडण्यासाठी धोकादायक साकवा शिवाय दुसरा पर्यायी मार्ग नाही.त्यामुळे घिसर येथील कचरे वस्ती,हिरवे वस्ती, रायदांड धनगर वस्त्यां तसेच शेतकऱ्यांना धोकादायक साकवावरुन ये जा करावी लागत आहे.
अनेक वर्षे मागणी करुनही या ठिकाणी प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार घिसरचे उपसरपंच शिवाजी धिंडले व हिरवे वस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण हिरवे यांनी केली आहे.
घिसर गावाच्या वरच्या बाजुला धनगर समाजाची ढेबेवस्ती, हिरवे वस्ती आहे.घिसर ते ढेबेवस्ती व हिरवे वस्ती अंतर दोन किलोमीटर असुन जिल्हा परीषदेची शाळा घिसरमध्ये असल्याने या वस्त्यांनमधील लहान मुलांना दोन किलोमीटर चालत डोंगर दरयातुन या कुजलेल्या लाकडी पुलावरून जावे लागतं आहे.
एखाद्या विद्यार्थ्याचा पाय या पुलामध्ये त्यामध्ये जाण्याची भिती निर्माण झाली आहे . पाऊस जास्त असल्याने या नदीला नियमित जास्त पाणी असल्याने मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. चार पाच वर्षापुर्वी शासनाने पुलांचे बांधकाम चालु केले होते.त्यावेळी ढेबेवस्तीजवळ केवळ दोन पिलर उभे केले त्यानंतर काहीच काम केले नाही.
येथील विद्यार्थ्याकडे शासन व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाले असल्याचे चित्र सध्या पाहायवयास मिळत आहे.या ठिकाणी पक्का पुल बांधावा अशी मागणी येथील उपसरपंच शिवाजी धिंडले व लक्ष्मण हिरवे रघुनाथ कचरे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कचरे मारुती हिरवे , मारुती हिरवे, भरत हिरवे केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.