शिवाजीनगर - शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील वडारवाडी येथे डॉ. होमी भाभा रूग्णालयाच्या समोर , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने, महापालिका आरोग्य विभागाच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या दरम्यान रस्त्यावर महिलांची प्रातिनिधिक स्वरूपात प्रसूती करण्यात आली. संबंधित रूग्णालयाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून रुग्णालय लवकर सुरू करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली.
सर्वसामान्यांना रूग्णांचा आधार असलेले वडारवाडी येथील डॉ. होमी भाभा रूग्णालय ( प्रसूती केंद्र) नुतनीकरणासाठी २०१८ मध्ये पाडण्यात आले. मात्र अद्याप रूग्णालयाचे बांधकाम पूर्ण न झाल्याने महिलांनी प्रसुतीसाठी कुठे जायचे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बांधकाम तात्काळ पुर्ण करून रूग्णसेवेसाठी रूग्णालय उपलब्ध करावे अशी मागणी अनेक वर्षापासून सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यानी प्रशासनाकडे केली आहे. मात्र प्रशासन वस्ती पातळीवर आरोग्य सेवा देण्यासाठी गांभीर्याने घेत नसल्याचे दिसते.
या वेळी वसंत मोरे, किशोर शिंदे, बाळा शेडगे, रणजित शिरोळे, वनिता वागस्कर, नरेंद्र तांबोळी, परीक्षित शिरोळे, केतन डोंगरे, जयश्री मोरे ,सुनील लोयरे, विशाल पवार, निलेश जुनवणे,गोकुळ अडागळे,आकाश धोत्रे, शंकर पवार, मयूर बोलाडे, सुरज कुसाळकर, जितेंद्र कांबळे, उदय गडकरी, राज टकले, जया विटकर यांच्यासह स्थानिक महिला, मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होत्या. मनसेचे शिवाजीनगर विभाग अध्यक्ष विनायक कोतकर यांनी आंदोलनाचे नियोजन केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.