Pune Polution Sakal
पुणे

Pune Polution : पुण्यातील प्रदूषणात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाढ; खासगी वाहनांची वाढती संख्या अन्...

प्रदूषण वाढल्याने राजधानी दिल्ली आज जे भोगत आहे, ते दुःख पुणेकरांच्या वाट्याला यायला वेळ लागणार नाही.

संभाजी पाटील @pambhajisakal

Pune - पुण्यातील प्रदूषणात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे, त्याला इतर कारणांबरोबर खासगी वाहनांची वाढती संख्या हेही जबाबदार आहे.खरे तर हे सांगायला पर्यावरण अहवालाची किंवा ज्योतिषाची गरज नाही.

शहराच्या मूलभूत प्रश्नांबद्दल असलेली अनास्था, एकात्मिक नियोजनाचा अभाव, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे जाणीवपूर्वक केले जाणारे दुर्लक्ष अशी कारणे याला जबाबदार आहेत. शहरातील वाहतुकीचा वेग जसजसा मंदावेल तशी शहराची प्रगतीही मंदावणार आहे, त्यामुळे वेळीच पावले उचलायला हवीत.

शहराचा पर्यावरण अहवाल तयार करणे, हा केवळ सोपस्कार उरला असला तरी तो प्रशासनाच्या आणि नागरिकांच्याही डोळ्यात अंजन घालण्यासाठी पुरेसा आहे.

प्रदूषण वाढल्याने राजधानी दिल्ली आज जे भोगत आहे, ते दुःख पुणेकरांच्या वाट्याला यायला वेळ लागणार नाही. 'नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम' (एनसीएसी) अंतर्गत झालेल्या चाचणीत देशातील १३१ प्रदूषित शहरांच्या यादीत पुण्याचीही नोंद झाली आहे.

त्यामुळे केंद्र सरकारने पुण्यातील प्रदूषण कमी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून त्यासाठी निधी देऊ केला आहे. आता हा निधी केवळ केंद्र सरकारने फतवा काढला म्हणून खर्च न करता खरोखरच प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी खर्च व्हायला हवा.

शहरातील धुलिकणांचे प्रमाण वाढत्या वाहनसंख्येमुळे आणि नागरीकरणामुळे वाढत आहे. यातील नागरीकरण थांबवता येणार नाही, पण त्याला शिस्त लावता येणे शक्य आहे. यापेक्षाही दुसरा विषय म्हणजेच खासगी वाहनांनापासून होणारे प्रदूषण अधिक गंभीर असून, नियोजनाच्या अभावातून ते वाढले आहे.

शहरातील केवळ १९ टक्के नागरिक प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात. ८१ टक्के नागरिक खासगी वाहनातून त्यातही एका वाहनातून एकच व्यक्ती प्रवास करण्याचे प्रमाण जास्त आहे. याचाच अर्थ आपले शहर नियोजन, वाहतूक नियोजन चुकले आहे.

शहरातील पीएमपी पुरेशी नसल्याने, अपुरी पडत असल्याने नाईलाजास्तव नागरिकांना खासगी वाहनांकडे वळावे लागत आहे. पीएमपीला सातत्याने सापत्न वागणूक दिल्याने पीएमपी कधीच पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना पुरी पडली नाही. 'सकाळ' ने २०१२ मध्ये 'पुणे बस डे' हा उपक्रम घेतला.

त्यावेळी सुमारे दोन हजार बस रस्त्यावर आणल्या आणि या शहराला अडीच हजार बस गाड्यांची आवश्यकता असल्याचे सांगितले. दहा वर्षांनंतरही अडीच हजार हा बसचा आकडा आपल्याला गाठता आला नाही.

सहाजिकच ही पोकळी खासगी वाहनांनी भरून काढली. बस वाढविण्याचा विषय राजकारण्यांनी केवळ टेंडर आणि कमिशनच्या भोवतीच फिरवत ठेवला. शहराच्या, नागरिकांच्या हिताचा विचार कधी झालाच नाही, त्याचेच दुष्परिणाम आज नागरिकांना भोगावे लागत आहेत.

आजही पीएमपीच्या केवळ १६५० ते १७०० बस रस्त्यावर धावतात. लोकसंख्येच्या निकषानुसार किमान साडे तीन ते चार हजार बस पीएमपीच्या ताफ्यात हव्यात. पण बससंख्या त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा यासाठी कधीही गांभीर्याने विचार झाला नाही.

एवढेच काय पण पीएमपी ला कधीही चांगला अधिकारी टिकू दिला नाही. यापूर्वीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया हे काही सुधारणा करीत होते, पण त्यांची बदली करण्यात आली. पीएमपी मध्ये खासगी ठेकेदारांची मनमानी वाढत आहे,

त्यातून खासगी बस कशा वाढतील यावरच भर दिसतो. इथले लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकार या दोघांनाही पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी असे वाटत नाही, हे दुर्दैव आहे.

पुण्यात एका वर्षात अडीच लाख नवीन वाहने रस्त्यावर आली. ज्या शहरात ३६ लाख वाहने रस्त्यावर असतील तेथे वाहतुकीची परिस्थिती काय असणार? ही वाहने हवेतील प्रदूषण वाढवणारच. ओला, उबेर सारख्या अॅप वर उपलब्ध होणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे. पण ही वाहनेही एक किंवा दोन प्रवाशांचीच वाहतूक करतात. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या वाढतच आहे.

खासगी आणि इतर वाहने कमी करण्यासाठी पीएमपीसारखी अधिक प्रवासी वाहतूक करणारी व्यवस्थाच हवी. मेट्रोचा दुसरा टप्पा १ ऑगस्टपासून सुरू होत आहे. पण हा मार्ग अपूर्ण असल्याने त्याने रस्त्यावरील वाहतूक फारशी कमी होईल, असे नाही. सुरू होणाऱ्या मेट्रोसाठी पीएमपी किंवा इतर वाहतूक व्यवस्थेचे जाळे तयार

करण्यात आलेले नाही. त्यामुळे इच्छा असूनही पुणेकरांना मेट्रोने जाता येईल काय याविषयी शंका आहे.

सध्या शहरातील वाहतुकीचा वेग ताशी १८ किलोमीटर एवढा कमी आहे. हिंजवडी, खराडी, नगररोड, हडपसर या शहराच्या नव्या औद्योगिक केंद्राकडे प्रवासाचा वेग आणखी कमी आहे. या वाहतूक कोंडीचा थेट परिणाम येथील गुंतवणुकीवर होत आहे. अनेक मोठ्या उद्योगांनी पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही, येथे रस्त्यावर दोन दोन तास कोंडीत वाया जातात यामुळे आपले उद्योग पुण्यातून हलवले आहेत. त्यामुळे हा विषय केवळ प्रदूषणापुरता मर्यादित नाही तर थेट शहराच्या आर्थिक गतीशी निगडित आहे.

यातून मार्ग काढण्यासाठी पीएमपीचे सक्षमीकरण, मेट्रोचा गतीने विस्तार, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सायकल वापरण्यासाठी प्रोत्साहन यासारखी पावले उचलावी लागतील. अन्यथा शहराची अवस्था आणखी बिकट आणि बकाल होईल.

हे नक्की करा.

  • - पीएमपीची बससंख्या वाढवणे

  • - पीएमपी आणि मेट्रोपर्यंत जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी वाढवणे

  • - प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी पोलिसांची मदत.

  • - लोकल रेल्वेचा विस्तार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT