pune rain Baba Bhide bridge in Pune has gone under waterdue to heavy rain 
पुणे

पावसाची जोरदार बॅटींग, अखेर पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली!

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे, यादरम्यान पुण्यातील भिडे पूल मंगळवारी रात्री उशिरा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. पुणेकरांना पाणी पुरवठा करणारे खडकवासला धरण (Khadakwasala Dam) हे १०० टक्के भरले असून धरणाच्या सांडव्यातून वाढविण्यात आला आहे.

रात्री आठच्या सुमारास १३ हजार १४२ क्युसेकने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून पुणे आणि धरण परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मागील २४ तासांत १४१ मीमी पाऊस झाला असून वरसगावये १३७, टेमघर १७० आणि खडकवासला धरण परिसरात ६० मिमी पाऊस झाला. यामुळे पुणेकरांची तहान भागवणारे खडकवासला धरण पूर्ण १०० टक्के भरले आहे. यामुळे धरणातून मुठा पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याने आणि धरण पूर्ण भरल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT