Pune Rain Rescue Operation : पुण्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, शहराला पाणी पुरवठा करणारी सर्व धरणं शंभर टक्के भरल्याने मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे मध्य भागातील बाबा भिडे पुल पाण्याखाली गेला आहे. या सर्वामध्ये एस. एम. जोशी पुलाखाली वात जाणाऱ्या कारमधील पाच जणांना अग्निशमन दलाने दाखवलेल्या प्रसंगावधाने मुंबईतील पाच जणांना जीवनदान मिळाले आहे. ही घटना गुरुवारी मध्य रात्री पावणे दोनच्या सुमारस घडली आहे. चिका लालवाणी वय. १३, प्रिया लालवाणी वय २२, कुणाल लालवाणी वय २८, कपिल लालवाणी वय २१, कृष्णा लालवाणी वय ०८ (सर्व रा. पालघर) अशी पुराच्या पाण्यातून सुखरुप वाचलेल्या नागरिकांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील काही जण त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पुण्यात आले होते. त्यांना भेटून हे सर्व जण त्यांच्या खासगी वाहनाने मुंबईकडे निघाले होते. त्यात धरण क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने सर्व धरण शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे गुरुवारी रात्रीच्या सुमारास खडकवासला धरणातून साधारण 26 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. यामुळे मध्य पुण्यातील बाब भिडे पुल आणि नदी पात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री १ वाजून ४६ मिनीटांनी एस एम जोशी पुलाखालील नदी पात्राच्या रस्त्यावर टाटा टिगोरो (MH 48 6151) कार पाण्यात वाहून जात असल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली. कारमधील नागरिक पुण्यात नातेवाईकांकडे आले होते त्यांना भेटून हे सर्वजण रजपूत विटभट्टीकडून नदी पात्रातील रस्त्याने निघाले होते. मात्र, पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याने चालकाला अंदाज आला नाही आणि त्यांची गाडी वाहून जात गरवारे पूलाखाली अडकली.
त्यानंतर याबाबत एरंडवणा केंद्राला याबाबत वर्दी मिळाली असता जवानांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्वरीत बचवाकार्य सुरु केले. घटनास्थळी दाखल होत जवानांनी नदी पात्रत उतरून वाहनातील नागरिकांना रोप, लाईफ जॅकेटच्यासाह्यायाने बाहेर काढले. यावेळी कारमधील सर्वजण भेदरलेल्या अवस्थेत होते. अधिक माहिती घेतली असता सदर गाडी आणि गाडीतील व्यक्ती मूळच्या पालघर येथील असून पुण्यात नातेवाईकांकडे आले होते आणि रजपूत विटभट्टी कडून कारमध्ये पात्रातील रस्त्याने जात असताना पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांची गाडी वाहून जात गरवारे पूलाखाली अडकली होती. दलाच्या जवानांनी त्वरित समयसूचकता दाखवत गाडी जवळ पोहचत या सर्वांना सुखरुप बाहेर काढले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.