Pune Rain sakal
पुणे

Pune Rain : पुण्यात पावसाचा जोर ओसरला

ढगाळ हवामान आणि पावसाच्या हलक्या सरींमुळे शहरातील तापमानात कमालीची घट झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune Rain - पुण्यात दाखल झाल्यावर जोरदार बॅटींग करणाऱ्या मॉन्सूनचा जोर आता काहीसा ओसरला आहे. पहिल्या दिवशी जवळपास १४ मिलिमीटर कोसळणारा पाऊस सोमवारी ०.४ मिलिमीटरवर येऊन ठेपला आहे. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी अजूनही पुण्याला मुसळधार पावसाची प्रतिक्षाच आहे. पुढील दोन दिवस शहरात आकाश मुख्यतः ढगाळ आणि काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

ढगाळ हवामान आणि पावसाच्या हलक्या सरींमुळे शहरातील तापमानात कमालीची घट झाली आहे. काल-परवा पर्यंत ३२ अंश सेल्सिअस वर असलेले कमाल तापमान आता २७.६ अंश सेल्सिअसवर आले आहे.

तर किमान तापमान २२.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यामुळे दिवसभर शहरात थंड वातावरण पाहायला मिळाले. शहराबरोबरच जिल्ह्यातही सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तरी नागरिकांनी घराबाहेर पडताना रेनकोट जवळ बाळगायला हवा.

घाटमाध्यावर ऑरेंज अलर्ट

राज्यात सर्वदूर मॉन्सून पोहोचल्याने अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणासह, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. मंगळवारी (ता. २७) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.

अंतर्गत ओडिशा, दक्षिण झारखंड, उत्तर छत्तीसगड परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीपासून वायव्य राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. गुजरातच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत असून, दक्षिण गुजरात पासून केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

वायव्य भारतात मॉन्सूनची प्रगती

यंदा केरळसह देशात यंदा काहीसा उशिराने दाखल झालेल्या मॉन्सूनने वेगाने घोडदौड देशाचा बहुतांशी भाग व्यापला आहे. सोमवारी (ता. २६) वायव्य भारतात मॉन्सूनने प्रगती केली असून, जम्मू काश्मिर, लडाख व्यापून, उत्तर अरबी समुद्र, गुजरात, राजस्थान, हरियाना, पंजाबच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

Winter Health Tips : हवामानातील बदलामुळे होणाऱ्या सर्दी-खोकल्याला वैतागला आहात, औषधांपेक्षा हे घरगुती उपाय ठरतील फायद्याचे

Healthy Food : मुलांसाठी पोषक आहेत हे लाडू, घरीच बनवा अन् नैसर्गिकरित्या मुलांची उंची वाढवा

Cherry Blossom Festival : चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल पहायला जपान,चीनला कशाला जायचं? भारतात आहेत ही खास ठिकाणं

Latest Maharashtra News Updates live : नागपूरमध्ये शहा, खर्गे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी

SCROLL FOR NEXT