pune rain news monsoon rain forecast weather rain in pune today yellow alert esakal
पुणे

Pune Rain News : पुण्यात पावसाच्या हलक्या सरी; घाटमाथ्यावर यलो अलर्ट कायम

आठवडाभरापासून सुटीवर असलेल्या पावसाने अखेरीस सार्वजनिक सुटीच्या दिवशी शहर आणि जिल्ह्यात हजेरी लावली

सम्राट कदम

पुणे : आठवडाभरापासून सुटीवर असलेल्या पावसाने अखेरीस सार्वजनिक सुटीच्या दिवशी शहर आणि जिल्ह्यात हजेरी लावली. रविवारी पहाटेपासूनच अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, तर दिवसभर ढगाळ हवामान पाहायला मिळाले.

गौरी-गणपतीच्या पार्श्वभूमीवर शहरात आत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. पण सकाळपासूनच रिमझीम पावसाने हजेरी लावल्याने अनेकांचे त्रेधातिरपीट उडाली. तसेच जिल्ह्याच्या पश्चिम भागात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. सध्या पुण्यासह राज्यातच मॉन्सूनसाठी पोषक वातावरण आहे.

त्यामुळे दिवसभर सामान्यतः ढगाळ वातावरण आणि सकाळी किंवा संध्याकाळी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे गणेश स्थापनेला वरुणराजाची हजेरी लागण्याची दाट शक्यता आहे.

राज्यातील वातावरण

मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. सोमवारी (ता. १८) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेर, कमी दाब क्षेत्राचे केंद्र, सागर, दाल्टोनगंज जमशेदपूर, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. उत्तर अंदमान समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

Ease of Doing Business: जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डुईंग बिझनेस' अहवालात भारताची मोठी झेप; जाणून घ्या काय आहेत कारण?

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

SCROLL FOR NEXT