pune rain news monsoon weather forecast esakal
पुणे

Pune Rain News : पुण्यात पावसाची विश्रांती दिवसभर ऊन - सावल्यांचा खेळ

मॉन्सूनची सक्रियता कमी झाल्यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मॉन्सूनची सक्रियता कमी झाल्यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतली आहे. पुढील आठवडाभर आकाश अंशतः ढगाळ तर तुरळक ठिकाणी अत्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मागील दोन दिवसांपासून पावसाची तीव्रता कमी होत असून, शनिवारी दिवसभर ढगाळ हवामान जरी असले तरी एक मिलिमीटरपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. शिवाजीनगर येथे एक मिलिमीटर आणि चिंचवड येथे ३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

रविवारी (ता.६) दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना पुढील आठवड्यात रिमझीम पावसापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. याच काळात निरभ्र आकाशाचेही दर्शन होईल.

सध्या मध्य प्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्यालगत समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या उत्तरेकडे सरकला आहे.

मॉन्सूनचा आस पंजाबच्या भटिंडापासून जिंद, मेरठ, हार्दोई कमी दाबाचे केंद्र, शांतिनिकेतन, मिझोरामपर्यंत विस्तारला आहे. त्यामुळे राज्यातही राज्याच्या काही भागात पावसाची उघडीप आहे. ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरी पडत आहेत.

रविवारी (ता. ६) कोकणातील पालघर, ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Gramin: 'कल्याण ग्रामीण'मधून महायुतीचा उमेदवार रिंगणात कधी? शिंदे गटाची आळीमिळी गुपचिळी

Share Market Closing: शेअर बाजाराचे जोरदार 'कमबॅक'; सेन्सेक्स 600 अंकांनी वाढला, बँक निफ्टीमध्ये मोठी वाढ

मायरा वायकुळच्या भावाला पाहिलंत का? दिवाळीच्या मुहूर्तावर दाखवला चेहरा, नेटकरी म्हणतात- हा तर हुबेहूब...

Tata-Airbus: नागपूरच्या टाटा एअरबस प्रोजेक्टचे गुजरातला उद्घाटन? काँग्रेसचा मोठा आरोप; "महाराष्ट्राच्या जखमेवर मिठ..."

Bjp Candidates Third List: लातूरमध्ये देखमुख विरुद्ध चाकूरकर थेट लढाई, भाजपची तिसरी यादी जाहीर; काँग्रेस बंडखोरांना संधी

SCROLL FOR NEXT