Pune Rain 
पुणे

Pune Rain: परतीच्या पावसानं पुण्यात दाणादाण! वाघोलीत धुंवाधार, पेठांमध्ये वाहनचालकांची कसरत

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : परतीच्या पावसानं पुण्यात अक्षरशः दाणादाण उडाली आहे. शहरातील मुख्य भाग असलेल्या पेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं वाहनचालकांना कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. तर पुणे शिवाजीनगर, पुणे विद्यापीठ चौक, बाणेर रोड या परिसरात सकाळपासूनच वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे.

सकाळपासूनच पुणे शहर, उपनगर आणि ग्रामीण भागात पाऊस सुरुच होता. त्यामुळं सकाळपासूनच वातावरण ढगाळलेलं होतं. शहर अंधारुन आल्यासारखं झालं आहे. सकाळपासून सूर्याचं देखील दर्शन झालेलं नाही. पण गेल्या तासाभरापासून शहर आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु आहे. त्यामुळं शहरातील विविध सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. तसंच शहरात मेट्रोची कामं सुरु असल्यानं मोठ्या प्रमाणावर ट्राफिक देखील जाम झाल्याचं पहायला मिळालं. Pune Rain latest update

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच हवामान खात्यानं पुणे शहरासह महाराष्ट्रात चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून पुणे शहराला पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. हा परतीचा पाऊस असल्याचंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. पावसाचा जोर कायम असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेंचा बीपी लो! बीडमध्ये तणाव, एसटी बंद; वडीगोद्रीमध्ये मराठे रस्त्यावर

KL Rahul प्रेमापोटी टीम इंडियाने दोन खेळाडूंना लटकवलं; ना रिलीज केलं ना टीम इंडियाकडून खेळण्याची संधी दिली

Ulhasnagar News : आयुक्त धावले सेवनिवृत्तांच्या मदतीला! 25-30 वर्षात मिळणारी कोट्यवधींची थकबाकी आता 10 महिन्यातच मिळणार

Otur News : पिंपळगाव जोगा धरणातील बेपत्ता मच्छिमाराचा अठ्ठेचाळीस तासाने मिळाला मृतदेह

Latest Maharashtra News Updates Live: अमित शहा नागपूरात आले त्यामुळं आम्हाला अपेक्षा होती - काँग्रेस

SCROLL FOR NEXT