पुणे

Pune Rain Update: पुणेकरांनो लक्ष द्या, डिंभे धरणातून अवघ्या चार दिवसांत झाला 'इतक्या' टीएमसी पाण्याचा विसर्ग

नवनाथ भेके, निरगुडसर

Latest Pune News: हुतात्मा बाबू गेणू जलाशय डिंभे धरण(ता. आंबेगाव)च्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सध्या विश्रांती जरी घेतली असली तरी २२ जुलै रोजी सकाळी धरणात २७.५३ टक्के पाणीसाठयानंतर अवघ्या १३ दिवसात धरण पाण्याने तुडुंब भरले आहे,धरण भरल्यानंतर चार दिवसांत २.८७ टीएमसी अतिरिक्त पाण्याचा विसर्ग घोडनदी पात्रात करण्यात आल्याची माहिती डिंभे धरणाचे उपअभियंता दत्तात्रय कोकणे यांनी दिली.

यंदा डिंभे धरणाचा पाणीसाठा नीचांकी अर्धा टक्के होता,जुलै मध्ये काहीसा पाऊस पडला त्यातून काहीसा टक्का वाढला पण पावसाला काही जोर सापडत नव्हता परंतु जुलै महिना संपण्याच्या तोंडावर २२ जुलै रोजी पावसाला जोरदार सुरुवात झाली.

त्यावेळेस धरणात २७.५३% पाणीसाठा होता पण २२ जुलै ते २५ जुलै चार दिवस झालेल्या जोरदार पावसाने पाणीसाठा दुप्पट होऊन २५ जुलै रोजी सकाळी ५६.४५ % वर पोहचला त्यानंतर धरणातील पाण्याचा टक्का वाढत गेला

२५ जुलै नंतर पुढील १० दिवसात धरण भरले आणि रविवार ४ ऑगस्ट रोजी सकाळी पावसाचा जोर वाढल्याने धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली,४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी धरणाचे पाचही दरवाजामधून २५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला त्यानंतर पावसाचा जोर अजून वाढल्याने विसर्ग वाढून ७५००,९०००,१२०००,१५०००,१८००० पर्यंत विसर्ग घोडनदी पात्रात करण्यात आला,त्याच रात्री पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याचा विसर्ग ३००० क्यूसेकने कमी करण्यात आला.

५ ऑगस्ट रोजी अजून कमी करण्यात आला आणि आता सध्या घोडनदी पात्रात २५०० आणि उजव्या कालव्यात १५० असा एकूण २६५० क्युसेकने विसर्ग सुरू असून धरणात आज (ता.०८) रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत ९२.४९% पाणीसाठा धरणात शिल्लक आहे.४ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या चार दिवसांत धरणातून घोडनदी पात्रात तब्बल २.८७ टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला असल्याची माहिती शाखा अभियंता दत्तात्रय कोकणे यांनी दिली.

यंदा धरण लवकर भरले

डिंभे धरण यंदा मागील वर्षीच्या तुलनेत लवकर भरले असून मागीलवर्षी धरणात याच दिवशी ८२% पाणीसाठा शिल्लक होता यंदा ९२.४९ % असून धरणातून २६५० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे,आंबेगाव,जुन्नर,शिरूर तालुक्यासह नगर,सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले धरण यंदा लवकर भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Disqualification Case: शिवसेना- राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अखेर मिळाला मुहूर्त; या तारखेला होणार सुनावणी

Latest Marathi News Updates : स्थानिकांनी घातला धारावी पोलीस ठाण्याला घेराव

Cha.Sambhajinagar: मराठवाड्यात काँग्रेस असणार मोठा भाऊ? या जागांवर केला दावा

Tirumala Tirupati Laddu: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये आढळले जनावराची चरबी अन् माशांचं तेल; 'या' पद्धतीने ओळखा तूपाची शुद्धता

Bigg Boss Marathi 5 Voting Trends: सुरजला जान्हवीने दिली टक्कर तर 'या सदस्याला मिळालेत सगळ्यात कमी वोट्स; कोण होणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT