पुणे

Pune Rain Update: सिंहगड रस्ता परिसरातील पूरबाधित भागात सावधानतेचा इशारा

जागृती कुलकर्णी

Latest Pune Rain Update: सिंहगड रस्ता परिसरातील एकता नगरी येथील द्वारका सोसायटीत पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून सध्या पाटबंधारे विभागाकडून नदीत २७ हजार क्युसेक पाणी सोडले आहे.

सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत एकता नगरी येथील सर्व सोसायटीतील नागरिकांना महापालिकेच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टीचा हवामान खात्याने अंदाज वर्तवलेलेला आहे.

त्या पार्श्वभूमीवर खडकवासला आणि इतर वरील धरणातून कमी अधिक विसर्ग होऊ शकतो म्हणून नागरिकांनी त्यांच्या पार्किंग मधील दुचाकी आणि चार चाकी गाड्या काढून घ्याव्यात तसेच घरातील अर्थात सदनिकेतील अत्यावश्यक आणि महत्त्वाचा साहित्य घेऊन घराला कुलूप लावून स्थलांतर करावे.

नागरिकांच्या मदतीसाठी पूरग्रस्त निवारा केंद्रामध्ये नागरिकांची सोय करण्यात आली आहे. यामध्ये सनसिटी भाजी मंडई शेजारील बचत गट केंद्र, अनुश्री मंगल कार्यालय माणिकबाग आणि कै. रमेशभाऊ वांजळे जलतरण तलाव सभागृह सनसिटी रस्ता येथे निवारा केंद्र उभारण्यात आले आहे.

यासोबतच सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत महापालिकेच्या चार शाळांमध्ये देखील व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान नदीपात्रातून पाणी वाहत आहे.

द्वारका सोसायटीच्या (पार्कींग) तळमजला येथे पाणी आले आहे. विठ्ठल नगर येथे नदीला मिळणाऱ्या ओढ्याचे पाणी फूगवटा निर्माण होण्यामुळे सांडपाणी वाहिन्यांच्या माध्यमातून पाणी नागरिकांच्या घरात परत फिरते आणि घरात पाणी येते. परिणामी परिसरात पाणी वाढत जाते. दरम्यान परिसरात अग्निशमन दलाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu: 'तिरुपती'च्या लाडूवरुन 'अमूल'चं स्पष्टीकरण; म्हणाले, आमचा पुरवठा...

IND vs BAN: भाई कॅमेरा अपने पे है! विराट-रोहितच्या मस्तीनं चक्क गंभीरलाही खळखळून हसवलं, ड्रेसिंग रुममध्ये Video Viral

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे बँकेत हेलपाटे,साडेअकरा लाख महिला पात्र : तिसऱ्या हप्‍त्याच्या प्रतीक्षेत

HC scraps IT rules: कुणाल कामराचा दणका! हाय कोर्टाने आयटी नियमावलीतील दुरुस्ती केली रद्द, आतापर्यंत काय-काय घडलं?

Latest Marathi News Updates : आरटीओ कर्मचारी संघटनेची परिवहन आयुक्तांशी झालेली चर्चा फीसकटली

SCROLL FOR NEXT