Pune Rain Update: मुळा-मुठा आणि भीमा नदीवरील बंधारे पाण्याखाली, गावांना सतर्कतेचा इशारा  sakal
पुणे

Pune Rain Update: मुळा-मुठा आणि भीमा नदीवरील बंधारे पाण्याखाली, गावांना सतर्कतेचा इशारा

संतोष काळे ः सकाळ वृत्तसेवा

Rahu Latest Update: पुणे शहर परिसर आणि धरण क्षेत्र परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आज दुपारच्या सुमारास मुळा-मुठा आणि भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले. मुळा मुठा आणि भीमा नदीच्या पात्रातील पाण्यात वाढ होत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुळा मुठा नदीवरील कोरेगाव मूळ ,दहिटणे ,राहू, वाळकी संगम, तसेच भीमा नदीवरील विठ्ठलवाडी, सांगवी सांडस, पाटेठाण, निमगाव म्हाळुंगी ,कोरेगाव भिवर, वडगाव बांडे येथील बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला.

अचानक वाढलेल्या नदी प्रवाहातील पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे वीज पंप पाण्याखाली गेले .तसेच अनेक पंपाचे पाईप देखील पाण्याबरोबर वाहून गेल्याचे दिसत होते.

पोलीस प्रशासन व नदीकाठच्या गावांनी बंधा-या शेजारी नागरिकांना सतर्कतेचा इशारा म्हणून सुरक्षा व्यवस्थेचे फलक लावण्यात आले आहे.

नागरिकांनी पाणी बघण्यासाठी सेल्फीचा मोह टाळावा, ज्यादा पाण्यात शिरू नये . तरुणांनी फोटोसेशन साठी उल्लडबाजी करू नये.असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या पुलांचा पर्यायी वाहतुकीसाठी उपयोग करावा

राहू -उंडवडी पुल, आष्टापूर -भवरापुर पूल, पिंपरी सांडस, तसेच पारगाव सा.मा. या पुलाचा पर्यायी वाहतुकीसाठी उपयुक्त करण्यात यावा. असे आव्हान सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhararvi News: धारावीमध्ये तणाव! मशिदीचा अवैध भाग पाडण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या गाड्यांची तोडफोड

Latest Marathi News Updates : धारावीमध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर; तणावाची स्थिती

Pitru Paksha 2024 : तुमच्या कुंडलीतही आहे का पितृदोषाचे सावट?; या लक्षणांवरून ओळखा

नवरा माझा नवसाचा 2 Movie Review: कथा नवसाचीच फक्त पॅर्टन वेगळा!

REIT Investment: फक्त 140 रुपयांमध्ये करोडोंच्या मालमत्तेत गुंतवणूक करा; भाड्यातून होईल मोठी कमाई

SCROLL FOR NEXT