पुणे

Pune Rain Update: आंबेगाव व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; डिंभे धरणातून उजव्या कालव्यात आले पाणी!

Pune Latest News : कालव्यातील पाणी शिरूर तालुक्यातील गावांपर्यंत जाईल असा विश्वास डिंभे धरणाचे उपअभियंता दत्ता कोकणे यांनी व्यक्त केला.

डी. के. वळसे पाटील

Manchar Latest News: कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) उजवा कालव्यात बुधवारी (ता.७) १५० क्यूसेक्स क्षमतेने पाणी सोडण्यात आले आहे. आंबेगाव- शिरूर तालुक्यांतील सुमारे ६० गावांतील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार असून, याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

याबाबत डिंभे धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर म्हणाले “डिंभे धरण ९१.९२ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून घोड नदीत ४हजार क्यूसेक्स विसर्ग कमी करून २हजार ५०० क्यूसेक्स करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी ता.७ ऑगस्ट रोजी एकून ३६२ मिलीमीटर पाऊस झाला होता. डिंभे धरण ८१.४६ टक्के भरले होते. यावेळी बुधवारपर्यंत एकून ७९१ मिलीमीटर झाला आहे. डिंभे धरण ९१.९२ टक्के भरले आहे.”

उजव्या कालव्यातील पाण्याचे घोडेगाव, नारोडी, लांडेवाडी, मंचर, शेवाळवाडी, अवसरी खुर्द, गावडेवाडी, मेंगडेवाडी, जारकरवाडी आदी गावातील शेतकऱ्यांनी नारळ व फुले वाहून पूजन केले. शुक्रवार (ता.९) पर्यंत कालव्यातील पाणी शिरूर तालुक्यातील गावांपर्यंत जाईल असा विश्वास डिंभे धरणाचे उपअभियंता दत्ता कोकणे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात; बँक निफ्टी तेजीत, अदानी समूहाचे शेअर्स घसरले

Amravati Assembly Election 2024 : अनिश्चिततेचे ढग; बंडखोरांनी बिघडविले गणित...विजयाचा दावा कोणाचाच नाही; मतविभाजन ठरविणार आमदार

Back Pain In Winter: हिवाळ्यात पाठदुखीचा त्रास वाढलाय? पेन किलर न घेता 'या' पद्धतीने मिळवा झटपट आराम

Yavatmal Assembly Election : नेत्यांची राजकीय परीक्षा घेणारी निवडणूक...निकालानंतर अनेकांचा राजकीय प्रवास थांबण्याची शक्यता

Vidarbh Election 2024 : वाढलेल्या टक्केवारीने वाढला संभ्रम....चिमूर, राजुरामध्ये भाकरी फिरणार; उमेदवारांचा विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT