पुणे

Pune Rain Update: शहरातील ४ हजारांहून अधिक नागरिक पूरबाधित, जाणून घ्या कुठे केले स्तलांतर

महापालिका प्रशासनाने 4 हजारांहून अधिक नागरिकांचे शाळा, समाजमंदिरे, मंगल कार्यालयांमध्ये तात्पुरती निवासाची व्यवस्था केली आहे

सकाळ वृत्तसेवा

Pune Latest Update: खडकवासला धरणातून गुरुवारी पहाटे सोडलेल्या पाण्यामुळे शहरातील नद्यांच्या काठावरील सोसायट्या, वस्त्यांमधील नागरिकांना सर्वाधिक फटका बसला. नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) परिसरासह पुणे स्टेशन, बाणेर, बालेवाडी, येरवडा येथे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. महापालिका प्रशासनाने 4 हजारांहून अधिक नागरिकांचे शाळा, समाजमंदिरे, मंगल कार्यालयांमध्ये तात्पुरती निवासाची व्यवस्था केली आहे.

खडकवासला धरणसाखळीमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून खडकवासला धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे धरणातून गुरुवारी पहाटे ३५ हजार क्‍युसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या सोसायट्या, वस्त्या, बंगल्यांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सिंहगड रस्तावरील एकता नगरी, जलपूजन, द्वारका सोसायटी, शरदा सरोवर सोसायटी, श्याम सुंदर, निंबजनगर, सरितानगरी या सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. याबरोबरच वारज्यातील स्वामी विवेकानंद, फ्युचेरा सोसायटी, शिवणे येथील सदगुरू सोसायटी , येरवड्यातील इंदिरानगर, भारत नगर, शांतिनगर, शिवाजीनगर पाटील इस्टेट, पुणे स्टेशन येथील ताडीवाला रोड या परिसरातील वस्त्या, घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली.

दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून पुरबाधित नागरिकांची स्थानिक शाळा, समाज मंदिरे, मंगल कार्यालयांमध्ये तात्पुरते स्थलांतर करण्यात आले. १८ पीएमपीएल बसने नागरिकांना शाळांपर्यंत पोचविण्यात आले, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

इथे केले नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर

सराफी शाळा (वडगाव शेरी) - ३५०, नानासाहेब परुळेकर शाळा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हॉल, वि.ग.घाटे शाळा (फुलेनगर, शांतिनगर) - ६५०,

आदर्श शाहु महाराज विद्यालय (मुंढवा) - १००, ढोले पाटील शाळा -३५०, राजेंद्रप्रसाद शाळा (बोपोडी) - १५०. बालवडकर शाळा (बालेवाडी) - २००

चिखलवाडी शाळा (बाणेर) - १००, इंदिरा गांधी शाळा (औंध) - १००, आंबेडकर शाळा पीएमसी (वाकडेवाडी) - १७५, पुरबाधितांना शाळा क्रमांक ४७ (न.ता.वाडी) २००, मेजर राणे शाळा (शिवाजीनगर) - ५०, एकतानगर, विठ्ठलवाडी येथे २०० पुरबाधितांना स्थलांतरित केले. याबरोबरच एरंडवणा येथील खिलारे शाळा, बारणे शाळा, सणस शाळा येथे, सिंचन भवन परिसरातील कलमाडी शाळा, मंगळवार पेठेतील बुद्धविहार, दत्तवाडी येथेही नागरिकांना तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT